
नवी मुंबई – लैंगिक अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नवी मुंबईतील भाजप आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्याविरोधात बेलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.(Ex-minister Ganesh Naik’s difficulty in ‘that’ case increased; Filed a crime)
नाईक यांच्याविरोधात एका महिलेनं पोलीस ठाणे आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. पीडित महिलेनं गणेश नाईक यांच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. गणेश नाईक पीडित महिलेसोबत 1993 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
यातून या दोघांना 15 वर्षाचा मुलगाही आहे. महिलेने नाईक यांच्याकडे वैवाहिक आणि पितृत्वाचा अधिकार मागितला असता नाईक यांनी महिलेला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.(Ex-minister Ganesh Naik’s difficulty in ‘that’ case increased; Filed a crime)
दणदणीत विजयानंतर जयश्री जाधवांची प्रतिक्रिया; म्हणाले,कोल्हापूरच्या जनतेने..#Kolhapur #ByElectionResults2022 #KolhapurNorthByElectionResult https://t.co/8H7qd3oT7k
— DNA (@dnamarathi) April 16, 2022