
अहमदनगर – अवघ्या काही दिवसांवर जिल्हा परिषद व पंचायत समितीची (Zilla Parishad and Panchayat Samiti) निवडणूक येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीचे ध्येय डोळ्यामोर ठेऊन आता जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी विकास कामांचे उरकून घेण्यावर सदस्यांनी भर दिला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम लवकरच बिगूल वाजणार आहे. अद्याप गट व गणाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाही. पण आपल्या गटात व गणात काय आरक्षण पडेल, याचा अंदाज काहींनी घेतला घेतला आहे. त्यानुसार काहींनी आतापासूनच डावपेच टाकण्यास सुरवात केलेली आहे.
आपला गट व गण आरक्षीत झाला तरी काहीजण शेजारील गट व गणात जाऊन निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरु केलेल्या आहेत. काहींनी गट गेला तरी गणातून निवडून येऊन पंचायत समितीच्या माध्यमातून गावात व गटात व गणात कामे करण्याचे नियोजन सुरु केलेले आहे. त्यासाठी घरातील इतर लोकांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्याची तयारी केलेली आहे.
काहींनी तर आपल्याला उमेदवारी नाही मिळाली तर प्रतिस्पर्ध्याला कसे नामोहरण करायचे याचेही डावपेच आतापासून टाकण्यास सुरवात केलेली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे.