श्रीगोंदा :- श्रीगोंदा नगरपरिषदेच्या माध्यमातून श्रीगोंदा शहरातील अतिक्रमण काढण्याचे काम सुरू आहे त्यामध्ये आजी माजी आमदार यांची कार्यालये सुद्धा कारवाई मधून वाचली नाहीत त्यामुळे सुरू असलेली अतिक्रमण कारवाई मध्ये मुख्याधिकारी सध्या दबंग अधिकारी असल्याचे बोलले जात आहे.
श्रीगोंदा नगरपरिषदेच्या माध्यमातून गेल्या दोन दिवसांपासून अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली जात असून पहिल्या दिवशी काष्ठी रोड पेडगाव रोड तसेच बसस्थानक परिसरातील बेकायदेशीर हॉटेल वर तसेच शनी चौक तसेच सुप्रसिद्ध उपसरपंच चहा यारख्या मोठ्यामोठ्या दुकानावर धडक कारवाई करण्यात आली त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या माऊली या संपर्क कार्यालयाचा काही भाग मोठ्या पोलीस बंदोबस्तात तोडण्यात आला नंतर त्यांनी काही खाजगी मजूर लावून अतिक्रमण झालेले काढून घेतले मात्र माजी आमदार राहुल जगताप यांच्या कार्यालयाचा बोर्ड उतरवून समोरील झेंड्याचा खांब त्यांनी मजूर लावून काढून घेतला आहे तसेच नगरपरिषदेच्या अभ्यासकीच्या बाजूचे अतिक्रमण काढण्यासाठी नगरपरिषदेच्या अधिकारी कर्मचारी यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी यांना तेथील अतिक्रमण काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात जोर लावावा लागला तसेच शहरातील विविध ठिकाणी असलेले उंच फलक गॅस कटर च्या साह्याने कट करून जमीनदोस्त केले आहेत त्यामुळे आता शहरातील सर्व रस्ते मोकळा स्वास घेताना दिसत आहेत असे सर्व सामान्य नागरिकांतून बोलले जात आहे तसेच न भूतो ना भविष्य होणारी अतिक्रमण कारवाई झाल्याने मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना दबंग मुख्याधिकारी अशी श्रीगोंदा वाशियानी उपमा दिली आहे.
तोंड बघून कारवाई करतात ?
श्रीगोंदा शहरातील अभ्यासिका जवळील अतिक्रमण काढण्यासाठी सर्व लवाजमा गेला असता त्या ठिकाणी महिलांकडून मोठ्याची तोंड बघून कारवाई करत नाही तर आम्हाला गरिबाला कोणी वाली नाही त्यामुळे तुम्ही तोंड बघून कारवाई करता असा आरोप आदिवासी समाज्यातील महिलांनी प्रशासनावर केला होता.
गल्लीतील अतिक्रमण कधी काढणार?
श्रीगोंदा शहरातील रविवार पेठ,झेंडा चौक,काळकाई चौक,होनराव चौक,या ठिकाणी मोठ्या लोकांचे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे मात्र या सर्व परिसरातील व्यवसाईक राजकारणी लोकांना रसद पुरवत असल्याची चर्चा आहे त्यामुळे या परिसरातील अतिक्रमण निघणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.