वाळूमध्ये सर्वांचेच हात बरबटलेले प्रत्येकाचे दर सोशल मीडियावरती जाहीर

0 13

 श्रीगोंदा   :-  श्रीगोंदा तालुक्यातील गार अजनुज कौठा या परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा चालू असल्याची  पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट एका पत्रकाराने टाकतात तेथीलच एका नागरिकाने  तहसीलदार पोलीस निरीक्षक पत्रकार पोलीस उपाधीक्षक कर्जत तसेच श्रीगोंदा वनविभाग यांच्या प्रत्येकाचे दरपत्रक परिसरातील नागरिकांनी शोशल मीडियावर जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली आहे  .

Related Posts
1 of 1,290
श्रीगोंदा तालुक्यातील  गार कौठा आर्वी अनगरे अजनुज हे श्रीगोंदा तालुक्यातील वाळूचे आगार मानले जाते  या ठिकाणी अहोरात्र मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने आता चक्क परीसरातील नागरिकांनी याबाबत सोशल मीडियाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे यामध्ये प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला वाळूतस्कर किती पैसे देतात याची जाहिरात कडेवाडी सादर केली असून यामध्ये श्रीगोंदा तहसीलदार यांना दर महिन्याला तीस हजार रुपये तर पोलीस निरीक्षक यांना २५ हजार रुपये पोलीस सब इन्स्पेक्टर यांना पंधरा हजार रुपये विभागीय पोलिस उपाधीक्षक कार्यालय कर्जत श्रीगोंदा यांना दहा हजार रुपये तर काही ठिकाणी वनविभागाचे हद्द असल्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये प्रमाणे पैसे दिले जातात.
मग त्यातून त्यानंतर उरलेसुरले पत्रकार यांनाही दर महिना पंचवीस हजार रुपये दिले जातात अशी पोस्ट सोशल मीडियावरती नागरिकांनी जाहीर केली असून याबाबत तालुक्यातून चर्चेला उधाण आले आहे मात्र वाळूच्या प्रकरणात सर्वांचेच हात बरबटलेले आहेत असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही त्यामुळे  नेमका चोर कोण ?  हे नागरिकांनी कसे ओळखावे असे जनतेतून खुलेआम विचारले जात आहे तसेच पंचवीस हजार रुपये घेणारा तो पत्रकार नेमका कोण याबाबत सुद्धा चर्चेला उधाण आले असून ज्या नागरिकांनी सर्वांचे दरपत्रक सोशल मीडियावर जाहीर केले आहे त्यांनी पंचवीस हजार रुपये महिना घेणारा पत्रकार कोण याचे नाव जाहीर करावे अशी मागणी नागरिकांतून होताना दिसत आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: