अर्र.. चीनमध्ये आणखी एका महामारीची एन्ट्री; माणसामध्ये पहिल्यांदाच आढळला ‘हा’ Virus

0 318
Err .. another pandemic entry into China; The 'this' virus was first found in humans
 दिल्ली  –  चीनमध्ये (China) कोरोना (Corona) नंतर आता पुन्हा एकदा नवीन महामारीने (pandemic) एन्ट्री केल्याने जगाच्या चिंतेत वाढ झाली आहे. जगात प्रथमच  मानवामध्ये एच3एन8 (H3N8) बर्ड फ्लूचा (bird flu) संसर्ग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  चीनच्या हेनान  (Henan) प्रांतात बर्ड फ्लूच्या H3N8 स्ट्रेनचा पहिला मानवी संसर्गाची नोंद झाली आहे. याबाबतची माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NHC) जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. (Err .. another pandemic entry into China; The ‘Ha’ virus was first found in humans)
मात्र दिलासादायक बाब म्हणजे लोकांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. H3N8 बद्दल अधिक माहिती देताना चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने सांगितले की, एका चार वर्षांच्या मुलाला याचा त्रास झाला होता. NHC नुसार, तापासह अनेक लक्षणे विकसित झाल्यानंतर मुलाला H3N8 विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले.त्यांच्या संपर्कात आलेली कोणतीही व्यक्ती या विषाणूच्या विळख्यात आली नाही, ही दिलासादायक बाब आहे. NHC नुसार, मुलगा त्याच्या घरात पाळलेल्या कोंबड्या आणि कावळ्यांच्या संपर्कात आला होता. त्यानंतर त्याच्यामध्ये तापासह अनेक लक्षणे दिसली आणि तपासणीत त्याला संसर्ग झाल्याचे आढळून आले.
Related Posts
1 of 2,446

आरोग्य आयोगाने सांगितले की H3N8 प्रकार घोडे, कुत्रे आणि पक्ष्यांमध्ये जगात प्रथम आढळला आहे. तथापि, H3N8 चे कोणतेही मानवी प्रकरण नोंदवले गेले नाही. म्हणजेच ही जगातील पहिली मानवी केस आहे. या प्रकारात अद्याप मानवांना प्रभावीपणे संक्रमित करण्याची क्षमता नव्हती. अशा स्थितीत मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार होण्याचा धोका कमी आहे. (Err .. another pandemic entry into China; The ‘Ha’ virus was first found in humans)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: