अवैध वाळू वाहतूक होणाऱ्या परिसरात राहुट्या उभारा; महसूल प्रशासनाचे आदेश

0 265
Erect dwellings in areas where illegal sand is transported; Orders of revenue administration

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

पारनेर  –  तालुक्यातील उत्तर भागातून पोखरी, देसवडे, पवळदार, खडकवाडी, पळशी, तास, वनकुटे मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक नेहमी होत असते अवैध वाळू वाहतूक होत असल्याने सर्वसामान्य शेतकरी वर्गामध्ये दहशतीचे वातावरण वाळू वाहतूकदार व तस्कर करतात. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते अरुण रोडे (Arun Rode) यांनी दोन वर्षापासून आवाज उठवला आहे. महसूल मंत्री, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावाही केला आहे.

अरुण रोडे यांनी दि १ एप्रिल रोजी अवैध वाळू वाहतुकीमुळे उत्खनन झालेल्या खड्ड्यांचे मोजमाप सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात यावे ही प्रमुख मागणी घेऊन त्यांनी शेतकऱ्यांसह नदीपात्रात उपोषणाचा इशारा दिला होता. तालुक्यातील पळशी, खडकवाडी, पोखरी, पवळदार या नदीपात्रात बेसुमार वाळू उपसा पोलिस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. असा आरोप अरुण रोडे यांनी प्रशासनावर केला होता. यासंदर्भात त्यांनी वाळू उपसा बंद होण्यासाठी वेळोवेळी निवेदनही दिले होती. अखेर त्यांनी दिलेल्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने नमती भूमिका घेत. पारनेरचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी महसूल प्रशासन व पोलिस प्रशासनाला वाळू वाहतूक होत असलेल्या भागात बैठे पथक नेमण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नदीपात्रात अवैध वाहतुकीमुळे उत्खनन झालेल्या खड्ड्यांचे मोजमाप करण्यासाठी यंत्रसामग्री उपलब्ध करून खड्ड्यांचे मोजमाप घेण्याचे आदेश दिले आहेत व तसा अहवाल महसूल प्रशासनाला सादर करण्यात यावा असे त्यांनी सांगितले.

तहसीलदार यांच्या आदेशानंतर दि. १ एप्रिल रोजी शेतकऱ्यांसह पुकारलेल्या उपोषण सामाजिक कार्यकर्ते अरुण रोडे यांनी स्थगित केली असून पत्रकारांशी बोलताना अरुण रोडे म्हणाले की महसूल प्रशासनाने आता वाळू वाहतूकदारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा महसूल प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत कारवाई न केल्यास व पंधरा दिवसाच्या आत अहवाल सादर न केल्यास आंदोलनाची पुढील भूमिका ठरविण्यात येईल. मोठ्या प्रमाणात तालुक्यात वाळू वाहतूक व अवैध धंदे सुरू असून या विरोधात आपण लढत राहणार असून मी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी लढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळेपर्यंत मी माझी लढाई सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Posts
1 of 2,229

नदीपात्रातील खड्ड्यांचे मोजमाप होणार

अवैध वाहतुकीमुळे नदीपात्रामध्ये मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे रोडे यांनी  खड्ड्याचे मोजमाप करण्यात यावे अशी मागणी महसूल प्रशासनाकडे केली होती. यावर तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला नदीपात्रातील खड्ड्यांचे मोजमाप करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता नदीपात्रातील खड्ड्यांचे मोजमाप होणार आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: