DNA मराठी

शहरात अतिक्रमण कारवाई ठरली फार्स !

0 367
Encroachment action in the city became a farce!

 

श्रीगोंदा   :  श्रीगोंदा नगरपरिषदेचे (Shrigonda Municipal Council) मुख्याधिकारी मंगेश देवरे (Mangesh Deore) यांनी काही दिवसांपूर्वी अतिक्रमण (Encroachment) विरोधी कारवाई करण्याचा सूचना देऊनही अनेकांनी आपले अतिक्रमण काढून घेतले नाही त्यामुळे आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचे काम जोरात सुरू आहे सदरची कारवाई ही सलग तीन दिवस चालू राहणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी दिली आहे.

श्रीगोंदा नगरपरिषद ने मोठ्या प्रमाणात कारवाई चा बडगा उगरल्याने अनेकांची धांदल उडाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले नगरपरिषदेने बुधवारी  मोठ्या पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने सुरवातीला श्रीगोंदा काष्ठी रोडवरचे अतिक्रमण काढण्यास सुरवात केली तसेच  मेन रोड व इतर रोड लगतची अनेक दुकाने जमीनदोस्त केली. सकाळी वर्दळ असलेल्या या परिसरात सायंकाळी 4.30 च्या सुमारास सर्वत्र मलबा पसरला होता.श्रीगोंदा नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीगोंदा येथील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलेले आहे ते अतिक्रमण काही अंशतः काढले आहे आणि अजूनही तीन दिवस पोलीस बंदोबस्त घेऊन अतिक्रमण काढले जाणार आहे तसेच भविष्यात कोणीही अतिक्रमण करू नये यासाठी नगरपरिषदेच्या कार्यालयात अतिक्रमण विभाग कार्यरत करण्यात येणार आहे या विभागाच्या माध्यमातून दररोज शहरात गस्त घालणार आहे तसेच अतिक्रमण आढळून आल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल त्यामुळे भविष्यात कोणीही अतिक्रमण करू नये असे मुख्याधिकारी देवरे यांनी सांगितले अनेकदा सांगूनही मात्र दुकानदाराने दुकाने खाली न केल्याने नगरपरिषदेने संबंधित दुकानदारांना नोटीस बजावली होती. याबाबत दुकानदार यांनी गंभीरपणे न घेतल्याने  मात्र दुकानदारांना दिलासा मिळाला नाही.बुधवारी पथकाने पोलीस बंदोबस्तात दुकाने हटविली. ही कारवाई  पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाणकर अमित माळी तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी आदींनी केली.

संपूर्ण तयारीनंतरच कारवाई
श्रीगोंदा शहरातील दुकानांचे बांधकाम हटविण्यासाठी नगरपरिषदेने पोलीस बंदोबस्त मागितला होता. त्यानंतर श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह 50 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. नगरपरिषदेने  कारवाई करण्यासाठी २ जेसीबी व ५ ट्रॅक्टर यांसह 50 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावर लावले होते. सुरुवातीला काही दुकानदारांनी कारवाईला विरोध दर्शविला. मात्र मोठा पोलीस बंदोबस्तामुळे कारवाई सुरळीत पार पडली.
Related Posts
1 of 2,448
काही ठिकाणी अतिक्रमण पुन्हा पूर्ववत होण्यास सुरुवात?
श्रीगोंदा नगरपरिषदेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्चून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त घेऊन अतिक्रमणे काढण्यास सुरवात केली मात्र पुढे कारवाई सुरू असताना मागे बस स्थानक परीसरात फळ विक्रते यांनी पुन्हा अतिक्रमण पूर्ववत होऊ लागल्याने कारवाई केवळ फार्सचं ठरला आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
सर्वाना नियम सारखे का नाहीत ?
श्रीगोंदा नगरपरिषदेच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली मात्र काही नागरिकांना नियम वेगळा तर काहींना नियम वेगळा दाखवल्याने नागरिकांमधून तोंड बघून कारवाई केली जात असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे नागरिकांतून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.
भंगार सामानाची पळवापळवी
अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पत्र्याची दुकाने पाडल्यावर एका विशिष्ट समाज्याच्या लोकांनी पत्रा,गज,लाकडी फळी,लोखंडी पाईप,अँगल आदी सामानाची मोठ्या प्रमाणात पळवापळवी केल्याने अनेक दुकानंदारांचे मोठ्या प्रमाणात सामान गायब झाले आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: