बायो डिझेलची बेकायदेशिर विक्री करणारे अकरा आरोपीना मुद्देमालासह अटक

0 315

अहमदनगर –   नगर- सोलापूर रोडवरील वाटेफळ शिवारात उपविभागीय पोलीस अधिकारी, ग्रामिण विभाग व स्थानिक गुन्हे शाखेने करवाई करुन बेकायदेशिर बायो डिझेलची (biodiesel ) विक्री करणाऱ्या अकरा आरोपींना अटक केली आहे.

पोलीस उप महानिरीक्षक सो, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी बायोडिझेलचे अवैध धंद्यावर तात्काळ व प्रभावीपणे कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील बायो डिझेल विक्रीचे अवैध धंद्याबाबत गोपनिय माहिती घेत असताना 01 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत महिती मिळाली कि, अहमदनगर ते सोलापूर जाणारे रोडवर वाटेफळ, ता. नगर शिवारात हॉटेल स्वप्नील चे पाठीमागे मोकळया जागेत काही इसम विनापरवाना बेकायदा पिवळसर रंगाचे रसायनाची बायोडिझल म्हणून अनाधिकृतपणे विक्री करत आहे. तत्काळ कारवाई केल्यास आरोपी मिळून येतील.

या बातमीनुसार अनिल कटके यांनी अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग, अहमदनगर यांना कळविली. त्यानंतर  अजित पाटील,   यांनी सदरची माहिती लागलीच तहसिलदार, नगर तालुका यांना कळवून त्यांचे कार्यालयाकडून दोन शासकिय पंच व पुरवठा निरीक्षक वैशाली गजानन शिकारे यांना मिळालेल्या बातमीनुसार कारवाई करण्यासाठी बोलावून घेतले.

त्यानंतर अजित पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके, सपोनि / सोमनाथ दिवटे, पोसई / सोपान गोरे, सफी/नानेकर, पोहेकॉ/दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, विष्णू घोडेचोर, दिनेश मोरे, भाऊसाहेब काळे, पोना / शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, संदीप दरंदले, रविकिरण सोनटक्के, दिपक शिंदे, संतोष लोढे, सचिन आडबल, पोकॉ/मच्छिन्द्र बर्डे, योगेश सातपूते, रोहित येमूल, सागर ससाणे, मयूर गायकवाड, शिवाजी ढाकणे, प्रकाश वाघ, रविन्द्र घुंगासे, जयराम जंगले, चालक पोहेकॉ/ अर्जून बढे, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर तसेच पुरवठा निरीक्षक वैशाली गजानन शिकारे अशांनी मिळून सरकारी व खाजगी वाहनाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, नगर ग्रामीण विभाग येथून निघून बातमीमधील नमुद ठिकाणी नगर सोलापूर रोड वरील वाटेफळ शिवारातील हॉटेल स्वप्नीलच्या पाठीमागे जावून पाहणी केली असता सदर ठिकाणी ०३ टँकर व ०२ ट्रक व काही इसम उभे असलेले दिसले.
सदर ठिकाणी अचानक छापा टाकून सदरची वाहने तसेच बायो डिझेलची विक्री करणारे व विकत घेणाऱ्या इसमांना ताब्यात घेवून श्री. अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग, अहमदनगर यांनी त्यांना त्यांची स्वतःची व सोबत असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांची ओळख देवून त्यांना त्यांचे नाव गाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे पत्ते  अविनाश पोपटराव नाटकवय , बंडू बाळासाहेब जगदाळे , विजय अशोक वाडेकर ,योगेश भगवान गंगेकर ,चंद्रकांत शेखर सोनोने मुजमील राजू पठाण , सचिन दशरथ लामखडे (टँकर ड्रायव्हर), अरूण माधयन  (ट्रक ड्रायव्हर), वेडी आप्पा गंगा दूरई,( ट्रक ड्रायव्हर), बाबासाहेब सखाराम बोरकर,  असे असल्याचे सांगीतले.
Related Posts
1 of 1,608
त्यानंतर ताब्यात घेतलेल्या इसमाकडे जप्त करण्यात आलेल्या बायो डिझेल बाबत कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांचा साथीदार संजय अशोक साबळे, रा. निल हॉटेल, केडगांव बायपास, केडगाव, अहमदनगर याचे व त्याचे साथीदारांचे सांगण्यावरुन विक्री करीत असल्याचे सांगीतले. त्यावरुन साथीदार आरोपींचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. तसेच संजय अशोक साबळे याची माहिती घेतली असता तो सध्या जेलमध्ये असून आरोपी संजय अशोक सावळे याचे विरुध्द यापुर्वी खालील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई बी. जी. शेखर पाटील सो, पोलीस उप महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे आदेशाने सौरभकुमार अग्रवाल , अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर,  अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग, अहमदनगर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: