निवडणूक बिनविरोध मात्र कुकडी कारखान्यांचे चेरमन पदाचे दावेदार कोण ?

0 190
श्रीगोंदा –  श्रीगोंदे तालुक्यातील कर्मयोगी कुंडलीकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याची नुकतीच बिनविरोध निवड झाली  नवनिर्वाचित संचालक मंडळाची निवड झाल्यामुळे आता व्हा . चेअरमन पदाचे दावेदार कोण? जिल्हा परिषद येळपणे गट हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा गट समजला जातो कारण या गटात दोनदा सभापती पदाचा बहुमान  मिळाला. तालुक्याच्या राजकारणात येळपणे गट हा महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो . कै आण्णा पाटील पवार व बाबासाहेब ढवळे दिग्गज नेते या गटात होते . त्यांची या गटावर मोठी पकड होती .त्यानंतर अनिल विर यांनी धुरा सांभाळली तर विद्यमान जिल्हा परिषद  सदस्या कोमल वाखारे या धुरा सांभाळताना दिसत आहे.
माजी सभापती मिना देविकर यांचा  कार्यकाळ संपल्या नंतर ,  सर्व सामान्यांशी असणारी नाळ व राजकारण तेवत ठेवत पती संभाजी देविकर यांनी   सर्वसामान्यांच्या सुख दुःखात सहभागी होत . राजकीय वारसा पुढे नेत नव्याने संचालकपदी निवड झाल्यामुळे गटामध्ये सध्या देविकर यांना व्हाईस चेअरमन पदी निवड होईल अश्या दबक्या आवाजात  चर्चेला उधाण आले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सर्वांना वेळ देत असल्यामुळे आदरणीय कुंडलीक तात्यांचे खंदे समर्थक तेवढ्याच्या प्रभावीपणे राहुल जगताप यांना   साथ देणारे म्हणून परिसरात देविकर हे  ज्ञात आहे. गटामध्ये सर्वांच्या सुख दुःखात नेहमी सहभागी असल्यामुळे या पदाचे हेच प्रमुख दावेदार असल्याचा जनतेमधुन स्वर दिसत आहे.
Related Posts
1 of 1,635
  पंचायत समिती राजापूर गणातून गितांजली पाडळे यांच्या सभापती पदाच्या  माध्यमातुन  देवदैठण गणातून सदस्य कल्याणी लोखंडे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली येळपणे गटात नेहमी राजकारण्यांमध्ये उत्साही आणि खेळीमेळीचे वातावरण पहावयास मिळते. तर अरणगावचे जगताप यांचे कट्टर समर्थक कृषीउत्पन बाजार समिती संचालिका तसेच महिला रा कॉ च्या जिल्हाउपाध्यक्षा मिनाताई आढाव यांचे पती नवनिर्वाचित कुकडीचे संचालक मोहनराव आढाव यांची सुद्धा वर्णी लागू शकते ?
   स्व ..कुडलिक (तात्या) ) जगताप यांचे नेहमी हिंगणी गावावर  जास्त प्रभाव पहावयास मिळत होता . तोच विश्वास राहुल जगताप यांनी दाखविला  त्यामुळे अँड निवृत्ती वाखारे हे सुद्धा प्रमुख दावेदार असु शकतात ? माजी आमदार राहुल जगताप यांनी कारखाना संचालक मंडळाची बिनविरोध निवड जरी केली त्यात त्याना यश देखिल प्राप्त झाले .परंतु आता खरा कस व्हाईस चेअरमन पदासाठी लागणार आहे , कारण संचालक मंडळात बहुतांशी उमेदवार हे दावेदार राहणार आहेत . उत्सुकता शिगेला पोहचली असल्यामुळे व्हाईस चेअरमन कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. .
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: