
नगर : लहान मुलगी चालताना पाय वाकडे टाकते. याचा मनात राग धरून तिला अंघोळ घालणाऱ्या 70 वर्षीय महिलेस जबाबदार धरून शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना शहरांतील पिंजार गल्ली येथे घडली.
या बाबतची माहिती अशी की रिहान सादिक शेख (राहणार फर्याबाग, सोलापूर रोड, अ.नगर ) याची लहान मुलगी चालताना पाय वाकडे टाकते. या कारणावरून राग धरून मुलगी तान्ही असताना तिला अंधोळ घालणाऱ्या चुलतीस कारणीभूत धरून 70 वर्षीय हालीमा शेख हिस शिवीगाळ करीत तू माझी मुलगी तान्ही असताना तिला अंघोळ घालतांना दुश्मनी काढली.ती चालताना पाय वाकडे टाकते. आता तुला सोडणार नाही.
ठार मारून टाकीन असे म्हणून रिहान शेख याने हालिमा शेख या वृद्धेस लाकडी दांडक्याने मारहाण केली. पोलिसात तक्रार केली तर जिवंत सोडणार नाही. अशी धमकी दिली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी हालिमा महमदसाहब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रिहान शेख याच्या विरूद्ध गुन्ह्याची नोंद केली.