भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंच्या पत्नी ईडी कार्यालयात दाखल

0 145
 नवी मुंबई –  राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आज पुणे जिल्ह्यातील (Pune District) भोसरी एमआयडीसीतील जमीन घोटाळा (Bhosari MIDC land Scam) प्रकरणात  ईडी (ED) कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाल्या आहेत. या जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी ईडीने मंदाकिनी खडसे यांच्या चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानंतर आज मंदाकिनी खडसे या चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. (Eknath Khadse’s wife files ED case in Bhosari land scam case)
भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी मंदाकिनी खडसे यांनी मुंबई सेशन कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, 12 ऑक्टोबर रोजी सेशन कोर्टाने त्यांचा हा अर्ज फेटाळून लावला. त्यांच्याविरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे मंदाकिनी खडसे यांना अटक होण्याची शक्यता आहे. तर एकनाथ खडसे यांना प्रकृतीच्या कारणामुळे दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी 21 ऑक्टोबरला पुन्हा सुनावणी होणार आहे.
Related Posts
1 of 1,512
ईडीनं एक हजार पानांचे आरोपपत्र (Charge Sheet)दाखल केलं आहे. या आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. या सर्वांवर ईडीकडून मनी लॉड्रिंगचा आरोप लावला आहे. (Eknath Khadse’s wife files ED case in Bhosari land scam case)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: