‘या’ निवडणुकीत एकनाथ खडसे देणार भाजपाला मोठा धक्का , जाणून घ्या संपूर्ण माहिती

0 341
Eknath Khadse will give a big blow to BJP in this election, know the complete information

जळगाव –  भारतीय जनता पक्षातून (BJP) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणारे जेष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) भाजपाला मोठा धक्का देणार आहे. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत (Jalgaon District Bank election) छाननीअंती बाद झालेल्या हरकती विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता माजी मंत्री एकनाथ खडसे यांची निवड बिनविरोध झाल्याचं निश्चित झाले आहे. हा भाजपाला एक मोठा धक्का मानला जात आहे.  (Eknath Khadse will give a big blow to BJP in this election, know the complete information)

विभागीय आयुक्तांनी माजी आमदार स्मिता वाघ, मुक्ताईनगर येथील नाना पाटील , माधुरी अत्तरदे या तिघांसह अन्य चार जणांच्या हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननी प्रक्रियेत भाजपच्या स्मिता वाघ, नाना पाटील, माधुरी अत्तरदे, भारती चौधरी यांच्यासह खासदार रक्षा खडसे यांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अवैध ठरवण्यात आले होते.

“पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त” म्हणत नवाब मलिक यांनी केली एनसीबीची पोलखोल

Related Posts
1 of 2,139

उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्यानंतर भाजपच्या उमेदवारांनी त्यावर आक्षेप घेतला होता आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. मंगळवारी यावर कामकाज देखील झालं होतं. त्यानंतर गुरुवारी विभागीय आयुक्तांनी निर्णय दिला.  स्मिता वाघ यांचा अर्ज बाद झाला. अमळनेर येथे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील तर मुक्ताईनगर मधून नाना पाटील यांचा अर्ज बाद झाल्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांची निवड बिनविरोध झाल्याचं निश्चित झालं. (Eknath Khadse will give a big blow to BJP in this election, know the complete information)

हे पण पहा – तो दाढीवाला कोण एनसीबीच्या अधिकार्‍यांना माहीत आहे असा खळबळजनक गौप्यस्फोट नवाब मलिक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: