ED पुन्हा चर्चेत; अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात केली सर्वात मोठी कारवाई

मुंबई – बॉलीवूडची (Bollywood) चर्चित अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणीत वाढ झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आयकर विभागानं जॅकलिनच्या विरोधात आता पर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. आयकर विभागाने तिची संपत्ती जप्त केली आहे. यात ७.१२ कोटी रुपयांच्या फिक्स डिपॉझिटाचा ही समावेश आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आता मोठ्या अडचणीत सापडली आहे. आयकर विभागानं जॅकलिनच्या विरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत तिची संपत्ती जप्त केली आहे. ज्यात तिच्या ७.१२ कोटी रुपयांच्या फिक्स डिपॉझिटाचा ही समावेश आहे.
काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव २०० कोटींच्या मनी लँड्रिंग प्रकरणातील ठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) यांच्याशी जोडलं गेल्यानंतर जॅकलिन आयकर विभागाच्या रडारवर होती. दरम्यानच्या काळात जॅकलिनची कसून चौकशी देखील झाली होती. मात्र स्वतःवर लावण्यात आलेल्या आरोपांचं जॅकलिननं खंडन केलं होतं. सुकेश चंद्रशेखरसोबतचं रिलेशनशिप देखील तिने अमान्य केलं होतं. आता आयकर विभागानं जॅकलिनवर कारवाई करत तब्बल ७.२७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिन फर्नांडिसला ठग सुकेश चंद्रशेखरनं ५.७१ कोटी रुपयांच्या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. एवढंच नाही तर त्यानं तिच्या कुटुंबीयांनाही महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. हा सर्व पैसा सुकेशनं लोकांची फसवणूक करून आणि गुन्हेगारीतून कमावला होता. दिल्लीमध्ये तुरुंगात असताना त्यानं एका महिलेचे २०० कोटी रुपये फसवणूक करुन लांबवले होते. आयकर विभागनं दिलेल्या माहितीप्रमाणे जॅकलिनच्या विरोधातील ही प्राथमिक कारवाई आहे.