ईडी पुन्हा चर्चेत; IAS पूजा सिंघल यांच्या अडचणींत वाढ; १९ कोटींची रक्कम जप्त

0 392

 

रांची :  ईडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर केलेल्या कारवाईमुळे ईडी चांगलाच चर्चेत आहे. ईडीच्या विविध पथकांकडून अवैध खाणकाम आणि बेनामी कंपन्यांप्रकरणी विविध ठिकाणी छापे टाकण्यात आली आहे.

ईडीनं शुक्रवारी आयएएस अधिकारी आणि झारखंडच्या खाणकाम आणि उद्योग विभागाच्या सचिव पूजा सिंघल (Pooja Singhal) यांच्या सरकारी निवासस्थानासह, पतीच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित ठिकाणी छापे टाकले. ईडीनं पूजा सिंघल यांच्याशी संबंधित ठिकाणांहून 19.31 कोटी रुपये जप्त केल्याची माहिती दिली आहे. पूजा सिंघल यांच्यावर चतरा, खुंटी आणि पलामू जिल्ह्यात उपायुक्त असताना आर्थिक अनियमिततेचे आरोप लावण्यात आले होते. ईडीनं 20 ठिकाणी छापे टाकले आहे. ईडीनं जप्त केलेली रोख रक्कम ताब्यात घेण्यासाठी बस बोलवाली होती.

 

Related Posts
1 of 2,357

ईडीनं पूजा सिंघल यांचे सासरे कामेश्वर झा यांना अटक केली आहे. मधुबनी येथील निवासस्थानातून त्यांना अटक करण्यात आली. ईडीकडून या प्रकरणी अनेक ठिकाणी छापे मारण्यात आले. झारखंड, बिहार, राजस्थान, हरियाणा, नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातील मुंबईमध्ये ईडीनं एकाच वेळी छापे टाकले आहेत. रांचीमधील पंचवटी रेसिडेन्सी, ब्लॉक नंबर ९, चांदणी चौकातील हरिओम टॉवर, नवी बिल्डींग, लालपूर, पल्स हॉस्पिटल बरियातू आणि पूजा सिंघल यांच्या सरकारी निवासस्थानी ईडीनं छापे टाकले

पूजा सिंघल या झारखंडमधील वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. सध्या त्या खनिकर्म आणि उद्योग मंत्रालयाच्या सचिव म्हणून काम करत आहेत. पूजा सिंघल झारखंड राज्य खाण विकास महामंडळाच्या अध्यक्षा आहेत. भाजप सरकारच्या काळात त्या कृषी सचिव म्हणून काम करत होत्या.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: