ED in discussion again: raid on the house of the lawyer who filed a petition against Fadnavis; Many churches aboundED in discussion again: raid on the house of the lawyer who filed a petition against Fadnavis; Many churches abound

 नागपूर –  राज्यात पुन्हा एकदा सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. यावेळी ईडीने नागपुरातील (Nagpur) चर्चित आणि वादग्रस्त वकील सतीश उके (Satish Uke) यांच्या घरावर छापेमारी केली आहे. या छापेमारीमुळे राज्यात पुन्हा एकदा ईडी चर्चेत आली आहे. आज सकाळी ईडीने हि छापेमारी केली आहे . जमिनीच्या व्यवहारप्रकरणी हा छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

चौकशीनंतर ईडीने सतीश उके यांना ताब्यात घेतलं. सतीश उके हे काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील आहेत. सतीश उके यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यामुळे ते अधिक चर्चेत आले होते. आज सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी उके यांच्या नागपुरातील पार्वती नगरातील घरी छापेमारी सुरू केली. काही अधिकारी हे उके यांच्या घरी पोहोचले होते. यावेळी महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ईडीचे नऊ अधिकारी आणि दोन महिला अधिकारी उके यांच्या घरात दाखल होते. तसंच सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते. सतीश उके यांच्या घराबाहेर परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे. (ED in discussion again: raid on the house of the lawyer who filed a petition against Fadnavis)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *