‘ईडी’ ने दिला शिवसेनेला आणखी एक धक्का; ‘त्या’ आमदाराची ११ कोटींची संपत्ती जप्त

0 269
Rajya Sabha elections: Shiv Sena discusses 'that' names

 प्रतिनिधी – DNA मराठी टीम

 मुंबई –  मागच्या काही दिवसांपासून राज्यात ईडी (ED) मोठी कारवाई करत आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीने कारवाई करत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक केली होती तर दोन दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर मोठी कारवाई केली होती. या कारवाईमुळे शिवसेनेला (Shiv Sena) एक मोठा धक्का बसला होता.

तर आता पुन्हा एकदा ईडीने शिवसेनेला धक्का दिला आहे. पुन्हा एकदा राज्यात मोठी कारवाई करत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaikयांची ११.३५ कोटी रुपयांची संपत्ती  जप्त केली आहे. या संपत्तीमध्ये ठाण्यातील दोन फ्लॅट आणि जमिनींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, एनएसईएल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

Related Posts
1 of 2,452

काही महिन्यांपूर्वी ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाचीही चौकशी केली होती. मात्र, मध्यंतरी हा तपास थंडावला होता. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून प्रताप सरनाईक यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. मात्र, आता ईडीने त्यांची मालमत्ता जप्त करत शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला आणखी एक धक्का दिला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: