DNA मराठी

अपेक्षा कमी ठेवल्यास विवाह लवकर जमतील….

0 106

नगर : लग्न जमण्यासाठी अपेक्षा कमी ठेवल्यास लवकर लग्न जमतील असे प्रतिपादन माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केले.
चंदननगर येथील साई मंदिराच्या अनुसया हॉल येथे मराठी सोयरीक संस्था व चंदन नगर येथील जगदंब समूह यांच्यावतीने 68 वा मोफत वधू-वर मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
शरद पवार यांच्या त्या वक्तव्याचा अखेर झाला उलगडा….
या प्रसंगी य मराठी सोयरीक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुटे, कारखान्याचे संचालक कैलास सोनवणे, ज्ञानेश्वर भापकर, हेमंत आबा बत्ते, संदीप गारकर, सुनील करपे, शिक्षक संघाचे हवेली तालुकाध्यक्ष रमेश कुंजीर, माजी उपसभापती संजीवनी कापरे, हरिदास जगताप, उद्योजक संजय भापकर, अशोक जाधव, राजाभाऊ चौधरी, रत्नाकर शेळके, बाळासाहेब पराड, साहेबराव नवले आदी उपस्थित होते.
या मेळाव्याला वधू-वर व पालकांचा प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मोफत वधू वर मेळाव्याचे उद्घाटन माजी आमदार जगदीश मुळीक व समारोप युवा नेते सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान – नितीन भुतारे यांचा आरोप…
या मोफत मराठा वधू वर मेळाव्यामध्ये एकूण 225 नावनोंदणी झाली. त्यापैकी 65 वधू व 160 वरांची नाव नोंदणी झाली. या ठिकाणी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, बीड, नगर आदी जिल्ह्यातून वधू-वर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आधी पाच वर्षांपूर्वी चंदननगरमध्ये याच मराठी सोयरीक संस्थेकडून वधूवर परिचय मेळावा घेण्यात आलेला होता. शिक्षक मुकेश इंगवले यांनी सूत्रसंचालन केले. जयवंतराव मोहिते यांनी आभार मानले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी मराठी सोयरीक संस्थेचे मार्गदर्शक प्रा. योगेश कोतकर, शिवाजी भाकड, सनी नवले, संपत सोनवणे, रत्नाकर शेळके, शहाजी उकिरडे, अनिल नवले, विक्रम दौंडकर, बापू गायकवाड, प्रवीण रणसिंग, गावडे साहेब, मोहन रावळे, सदानंद थोरात, अनिल जावळकर, मोहन तापकीर, डब्ल्यू टी आर ग्रुप, बॅडमिंटन ग्रुप चंदन नगर -खराडी – वडगाव शेरी सर्व सहकारी मित्र मंडळ यांनी प्रयत्न केले.

Related Posts
1 of 2,565
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: