Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

अहमदनगर:- पोलीस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके (Sandeep mitke) यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार जाहीर केला आहे. याच बरोबर या पुरस्काराचे प्रशस्तीपत्र आणि रोख 25 हजार रुपये देखील मिटके यांना देण्यात आले आहे.
Dy.s.p.संदीप मिटके यांनी अहमदनगर शहर येथे कार्यरत असताना तोफखाना पोलीस ठाणे अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याचा सर्वोत्कृष्ट तपास केला होता या गुन्ह्याची महाराष्ट्र राज्यात जानेवारी 2021 महिन्यासाठी च्या सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या कामगिरी करता त्यांना गौरविण्यात आले आहे.अहमदनगर पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
15 सप्टेंबर 2018 च्या 3 ते 4 दिवस अगोदर सायंकाळच्या वेळेस पिडीत मुलगी भराड गल्ली तोफखाना अहमदनगर येथे बाकड्या जवळ सायकल खेळत असताना आरोपी अफसर लतीफ सय्यद हा पीडित मुलीला बंद घराच्या छतवर् घेऊन गेला तिला विवस्त्र करून हाताने मारहाण केली व् तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला त्यावेळी आरोपी मुन्नी ऊर्फ शमिना लतिफ सय्यद घटनास्थळी आली आणि तिने पीडित मुलीला झालेल्या प्रकाराबाबत तू तुझे घरी कोणाला काही एक सांगू नकोस नाहीतर मी तुझे घरी येऊन तुझे आईला तुझे नाव सांगेल अशी धमकी दिली व तिला तिच्या घरी पाठवून दिले त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी अफसर लतीफ सय्यद याने पीडित मुलीस पुन्हा सायंकाळीच्या वेळेस त्यात ठिकाणावरील बाकड्या जवळून उचलून त्यांच्या घराच्या छतावर नेले आणि पीडित मुलीस जीवे मारण्याची भीती दाखवून तिला विवस्त्र करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला तसेच कोणाला काही सांगू नको नाहीतर मी तुझा जीव घेईल असे म्हणून घरी पाठवून दिले त्यानंतर पीडित मुलीच्या पोटात दुखत असलेने फिर्यादी हि तिला दवाखान्यात चल असे म्हणाली असता पीडित मुलगी घाबरलेली होती फिर्यादी हिस काही सांगत नव्हती हे पाहून फिर्यादीने तिच्या बहिणीला फोन करून बोलावून घेतले व पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता पीडित मुलीने तीन दिवसापूर्वी तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत सांगितले फिर्यादीने सदर घटनेबाबत तिच्या पतीला सांगितल्यानंतर ते पीडित मुलीस तोफखाना पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यासाठी घेऊन गेले सदर घटनेबाबत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला सदर गुन्ह्याचे विरोधात राज्यभर पडसाद उमटले होते विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी मोर्चे व आंदोलने करून निषेध व्यक्त केला होता प्रथम या गुन्ह्याचा तपास Psi.विशाल सणस यांच्याकडे होता या. गुन्ह्याचे गांभीर्य व संवेदनशीलता ओळखून पुढील तपास Dy.s.pसंदीप मिटके यांचेकडे वर्ग करण्यात आला होता.
त्यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपी अफसर लतिफ सय्यद यास दोषी धरले आणि 20 वर्षे सश्रम कारावास व 50 हजार रु दंड आणि दंड न भरल्यास 1 वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा दिली. तसेच सदर दंडाची रक्कम पीडित मुलीस नुकसान भरपाईपोटी देण्याचे आदेश पारित केले . तर या प्रकरणात दुसरीआरोपी मुन्नी उर्फ शमीना सय्यद एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी Dysp संदीप मिटके आणि त्यांचे पथकातील परिविक्षाधीन Dysp पुनम पाटील,PSIविशाल सणस, PSI जया तारडे, ASI भालसिंग, HC सुयोग सुपेकर, PC याकूब सय्यद आदींनी केला होता.