बडे बारा इमाम सवारी उचलण्याचा मान Dysp संदिप मिटके व निसार जहांगीरदार यांना

0 274

अहमदनगर – दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील अहमदनगर शहरामध्ये मोहरम सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे.  काल कत्तलीची रात्र पडल्यानंतर आज मोहरम विसर्जन पार पडले यावर्षी मोहर्रम बडे बारा इमाम सावरी उचलण्याचा मान Dysp संदिप मिटके व निसार जाहंगिरदार यांना देण्यात आला.(Dysp Sandeep Mitke and Nisar Jehangirdar honored to pick up the big twelve Imam ride)

अहमदनगर शहरातील ऐतिहासिक मोहरम सण हे मुस्लिम धर्मीय नवीन वर्ष व मुस्लिम धर्मगुरु हसेन व हुसेन यांना मोहरम सणामध्ये सुमारे 400ते 500 साला पूर्वी यहुदी व मुस्लिम धर्मीय मध्ये झालेल्या युद्धामध्ये शहीद झाले असल्याने युद्धांमध्ये वापरण्यात आलेले शस्त्र  हे कोठला येथील मशिदीमध्ये असल्याने मोहरम सणांमध्ये 5  व्या तारखेला कोठला इमामवाडा या ठिकाणी हुसेन यांची सवारी ची स्थापना करतात व मंगल गेट हवेली या ठिकाणी हसन यांची सवारी स्थापन करतात.  मोहरमच्या 9 व्या तारखेला हसंन व हुसेन यांची हत्या झाल्याने त्या दिवशी रात्री 12/00 वाजता अहमदनगर शहरातील सुमारे 40ते45 यंग पार्टी चे कार्यकर्ते हे आळीपाळीने  खांदा देऊन सवारी उचलून अहमदनगर शहरात मिरवून सुमारे 6 किलोमीटर फिरून छोटे बारा इमाम व बडे बारा ईमाम सवारी कोठला या ठिकाणी पुन्हा बसवितात त्यानंतर मोहरमच्या 10 व्या तारखेला मोहरम विसर्जनाची मिरवणूक निघून यंग पार्टी पुन्हा सवारी खांदा देऊन  अहमदनगर शहरात फिरून सुमारे 09 किलोमीटर आंतर असून सावेडी बाराव याठिकाणी विसर्जन मोहरम मिरवणुक  मोठ्या प्रमाणात निघत असते तसेच अहमदनगर शहरात मोहरम सणानिमित्त भारतातून भाविक येत असतात.

चंदन चोरी करणाऱ्या एका आरोपीला बेलवंडी पोलिसांकडून अटक

Related Posts
1 of 1,486

यावेळी सवारी विसर्जन मिरवणूक  कोविड मुळे होऊ शकली नाही त्यामुळे याच परिसरामध्ये असलेल्या सवारी ज्या ठिकाणी बसवली त्या ठिकाणी आज सावरी विसर्जनाची तयारी सुरू करण्यात आली होती दुपारी 12/30 वाजता जागेवरच सवारी चे विसर्जन करण्यात आले कोरोना चे नियमांचे पालन करून सर्वांनी सवारी चे दर्शन घेतले यावेळी Dy.s.p.संदीप मिटके, pi गडकरी, pi न्याहळदे , निशार जाहंगिरदार , फरहान जहागीरदार, राजु जहागीरदार , अमीर जागीरदार, आरिफ मुजावर, शकील मुजावर इत्यादी मुस्लिम बांधव हजर होते.(Dysp Sandeep Mitke and Nisar Jehangirdar honored to pick up the big twelve Imam ride)

हे पण पहा – नगर पोलिसांची राज्यात प्रथम ई-टपाल(E-TAPAL)कार्यप्रणाली सुरु

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: