Dussehra Rally 2022 : ठाकरे आणि दसरा मेळावा; जाणुन घ्या संपूर्ण इतिहास

0 27

 

Dussehra Rally 2022 : शिवसेनेची (Shiv Sena) अनेक वर्षांची दसरा मेळाव्याची (Dussehra Rally) परंपरा आहे. दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काय होणार याची उत्सुकता शिवसैनिकांना असते. यासाठीच हजारो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कवर दाखल होतात.

30 ऑक्टोबर 1966 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा घेतला होता. दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे एक समीकरण बनलं. त्याला आता 55 वर्षे पूर्ण होतील.

अनेक राजकीय पक्षांकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करत आहेत पण एक पक्ष, एक नेता आणि एक मैदान हे शिवसेनेतच बघायला मिळत असल्याचं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात.

 

बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्कवर प्रचंड प्रेम होते

बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क या दोघांचा जन्म एकाचवेळी झाल्याच खूप कमी जणांना माहिती असल्याचं “शिवाजी पार्कला पूर्वी माइन पार्क असं संबोधलं जात होतं. 1927 साली या मैदानाचं नावं शिवाजी पार्क देण्यात आलं. याच साली बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला होता.

मुंबईत 1982 साली गिरणी कामगारांच्या संपाच्या वेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी भाषण केल होत. त्यावेळी दसरा मेळाव्याला त्यावेळी कॉंग्रेसमध्ये असणार्‍या शरद पवार आणि जॉर्ज फर्नाडिस यांना बोलविले होते.

Related Posts
1 of 2,361

2010 सालच्या दसरा मेळाव्यता बाळासाहेब ठाकरे यांनी आणि उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हातात तलवार देऊन राजकारणाच्या मैदानात उतरविले ‘ आणि त्याचा काळ्यात उध्दव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचं पूर्णपणे नेतृत्व हातात घेतले होते.

त्याच काळात बाळासाहेब ठाकरे यांना वयानुसार सभांना जाणं शक्य झाले नाही. 24 ऑक्टोबर 2012 साली झालेल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांना तब्येतीच्या कारणामुळे उपस्थित राहता आले नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले होते. दसरा मेळाव्याच्या त्या ‘भाषणात’ कडक शब्दात टीका करणारे बाळासाहेब हळवे झालेले महाराष्ट्राने पाहीले होते.

हे त्याचे शेवटचं भाषण
(ते म्हणाले होते “तुम्ही मला इतके वर्ष सांभाळलं. आता उद्धवला आणि आदित्यला सांभाळून घ्या आणि महाराष्ट्रात उत्कर्ष घडवा”. बाळासाहेब ठाकरे यांचं 2012 मधल्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांसाठी असलेलं ते शेवटचं भाषण ठरल होते )

‘त्या’ वेळी रद्द झाला होता दसरा मेळावा
शिवसेनेच्या इतिहासात आतापर्यंत दोनवेळा दसरा मेळावा रद्द करण्यात आला आहे. 2006 साली मुंबईत जोरदार पाऊस पडत होता. शिवाजी पार्कवर चिखल झाला होता काही ठिकाणी पाणी साचलं होतं. यामुळे दसरा मेळावा रद्द करावा लागला होता. 2009 साली विधानसभा निवडणुका लागल्या होत्या. आचारसंहितेच्या काळात दसरा मेळावा घेणं शक्य नव्हतं तेव्हा तो पुढे ढकलण्यात आला होता.

त्यानंतर कोरोनाच्या काळात 2 वेळा दसरा मेळावा बंदिस्त सभागृहात घेण्यात आला होता.

आणि यावर्षी शिवसेनेत उभी फूट पडल्याने उद्धव ठाकरे यांचा एक मेळावा आणि शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस आमदारांचा दुसरा दसरा मेळावा होत आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: