“या” कारणाने भारतात व्हॉट्सअ‍ॅपने ४६ दिवसात बंद केली ३० लाख अकॉउंट

0 207

नवी मुंबई –   देशातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया (Social Media) अ‍ॅप पैकी एक असलेला व्हॉटअ‍ॅप (WhatsApp) अ‍ॅपचे आपल्या देशात जवळ पास ५५ कोटी युझर आहे. हा अ‍ॅपदेखील आता नव्या आयटी नियमाअंतर्गत येते. या कायद्यानुसार भारतातील सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्याला यूजर्स सेफ्टी रिपोर्ट सरकारला द्यावा लागतो.  व्हॉटअ‍ॅपने दाखल केलेल्या रिपोर्टमध्ये जून-जुलै दरम्यान ३० लाखाहून अधिक अकॉउंटवर कारवाई केल्याचं समोर आलं आहे .( WhatsApp closed 3 million accounts in India in 46 days)

ऑनलाइन स्पॅम (Online spam) आणि गैरवर्तनाविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. फॉरवर्ड मेसेजेससाठी अ‍ॅपच्या गैरवापरसह विविध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अकॉउंटवर कारवाई करण्यात आली आहे. जूनपासून जुलैपर्यंत जवळपास ३० लाख २७ हजार अकॉउंट बंद केली आहेत. या अकॉउंटबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर ऑटोमॅटिक टूलद्वारे कारवाई करण्यात आली आहे. या कालावधीत ३१६ खाती ब्लॉक करण्यात आली आहेत. युजर्सच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तर ७३ खात्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. ४६ दिवसात युजर्सकडून ५९४ तक्रारी प्राप्त झाल्या असून ३१६ अकॉउंटवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे सुरक्षेच्या कारणास्तव इतर अकॉउंटच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

भाजप नगराध्यक्षाच्या विरोधात विनयभंगाची तक्रार , अश्लील चाळे केल्याचा आरोप

Related Posts
1 of 96

व्हॉट्सअ‍ॅप मीडिया प्लॅटफॉर्मवरील गैरवर्तन शोधण्यासाठी ऑटोमॅटिक टूल आहे. जर तुम्हालाही कोणत्या अकाँउंटबाबत तक्रार असेल तर [email protected] या ईमेलवर मेल करू शकता किंवा अ‍ॅपमधूनच खाते ब्लॉक करू शकता अन्यथा तक्रार करू शकता, असं व्हॉट्सअ‍ॅपने सांगितलं आहे.( WhatsApp closed 3 million accounts in India in 46 days)

हे पण पहा –  आमदार निलेश लंके यांच्या कामाचं राज्यमंत्री आदिती तटकरेंकडून कौतुक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: