नगर दौंड राज्यमार्गाच्या धुळीमुळे शेतकऱ्यावर लिंबोणीची बाग काढण्याची वेळ

प्रतिनिधी / दादा सोनवने :-
श्रीगोंदा – श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातून जाणारा नगर दौंड (Nagar-Daund) हा राज्यमार्ग अक्षरशः एका शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. राज्य मार्गालगत असणाऱ्या जमिनी मध्ये लिंबोणीची फळबाग शेतकऱ्याने लावली होती मात्र राज्य मार्गाच्या अपुऱ्या कामकाजामुळे उडणाऱ्या धुळीने लिंबोणीच्या झाडाना फळधारणा व सुधारणा होत नसल्याने शेतकऱ्यांना अक्षरशा लिंबोणी ची बाग ट्रॅक्टर लावून काढण्याची वेळ आली आहे. मात्र या नुकसानीला नेमके जबाबदार कोण ? या शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळणार का ? याकडे सर्व शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.
श्रीगोंदा तालुक्यातून जाणाऱ्या नगर दौंड या राज्य क्र 60 या मार्गालगत अनेक शेतकऱ्यांच्या शेती आहेत मात्र श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील महादेव वाडी परिसरात गट नंबर 37 मध्ये गुलाब भगवान पवार यांची शेती राज्य मार्गालगत आहे मात्र राज्य मार्गाच्या अपुऱ्या झालेल्या कामामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परिसरात धुळीचे साम्राज्य झाले आहे. या धुळीमुळे फळप्रक्रिया होत नसून आलेला बहर गळून पडत आहे असून याच भागात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्यामुळे त्यांच्या शेतातील सुमारे दोन एकर वरती असलेली लिंबोनीची तब्बल 265 झाडे आहेत त्यात लिंबाच्या बाजाराने द्विशतक पार केले असताना स्वतःची झाडे मात्र या धुळीमुळे काढावी लागत असल्याने शेतकरी पुरते हैराण झाले आहे . मात्र धुळीमुळे या झाडांना फळधारणा होत नसल्याने गुलाब पवार यांना आपल्या शेती मधील 265 झाडे ही ट्रॅक्टर लावून काढावी लागत लागली आहेत त्यामुळे याबाबत त्यांनी राज्यमार्ग कार्यालय तहसीलदार कार्यालयात अश्या अनेक ठिकाणी तक्रारी केल्या आहेत मात्र सगळीकडून त्यांना आजपर्यंत नकारघंटा मिळाली आहे याबाबत तालुका कृषी अधिकारी यांनी पंचनामा करून शासनाला अहवाल सादर करतो असा शब्द दिला होतां मात्र त्याचे पुढे काय झाले हे देवालाच माहिती अशी माहिती नाराजीच्या सुरात पवार यांनी दिली आहे.
Related Posts
नुकसानभरपाई मिळण्यासाठी दावा करणार
राज्य महामार्ग तसेच कृषी अधिकारी व ठेकेदार यांच्या विरोधात नुकसानभरपाई मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेऊन नुकसानभरपाई मिळून दोषी अधिकारी ठेकेदार यांच्या कारवाई करण्यासाठी न्यायालयात दावा करणार असल्याची माहिती पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.