अट्टल घरफोड्या करणाऱ्या आरोपीकडून ४७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

0 213

श्रीगोंदा  :-  श्रीगोंदा तालुक्यातील कोसेगव्हाण येथील प्रकाश अर्जुन चव्हाण यांच्या घराचे दिवसा कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्याने चोरून नेल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Due to the accused in the abscessors of the issue of Rs 47,500)

 या गुन्ह्याचा  तपास चालू असताना दि 22 आगस्ट रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी घाणेगाव ता पारनेर परिसरात आहे त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी मिळुन घाणेगाव ता पारनेर परिसरात कोंबिंग ऑपरेशन सुरू केले असता राजू अर्जुन काळे हा आरोपी मिळून आला त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने श्रीगोंदा तालुक्यातील कोसगव्हान येथील गुन्हा आपल्या साथीदार सोबत केल्याची कबुली दिली आहे.

हे पण पहा – तहसीलदार यांच्या अडचणीत वाढ, तहसीलदार यांची बदली करा नाहीतर आमची बदली करा – महसूल व तलाठी संघटना

Related Posts
1 of 1,608
त्यावेळी त्याच्याकडे असलेली दुचाकी राजगुरूनगर ता. खेड जिल्हा पुणे येथून चोरून आणल्याची कबुली दिली.  त्यावेळी श्रीगोंदा पोलिसांनी आरोपीकडून १७,५००रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ४७,५०० रुपयांचा मुद्देमाल श्रीगोंदा पोलिसांनी जप्त केली आहे या आरोपीवर नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये ३९५ नुसार गुन्हा दाखल आहे.  तसेच खेड पोलीस ठाण्यात भादवी३७९नुसार तर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात ४५४,३८० प्रमाणे गुन्हे दाखल आहेत सदरच्या कारवाई मध्ये पोलीस अधीक्षक मनोज पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक रामराम ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिलीप तेजनकर सहा पोलीस उपनिरीक्षक अंकूश ढवळे, मनोहर गावडे गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोऱ्हाडे,दादा टाके,अमोल कोतकर, विनायक जाधव आदी पोलीस कर्मचारी सहभागी होते.(Due to the accused in the abscessors of the issue of Rs 47,500)

लग्न दहा दिवसांवर येऊन ठेपले अनं..फोन आला; नवऱ्या मुलाने दुसऱ्या मुलीला पळविले.! 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: