मुलाच्या उपचारांसाठी पैसे नसल्याने पित्याने फेकले चिमुकल्याला नदीत 

0 362

कोल्हापूर –    कोल्हापूर (Kolhapur) च्या इचलकरंजी (Ichalkaranji) भागात आपल्या पाच वर्षीय मुलाच्या उपचारासाठी ( Treatment) पैसे ( money) नसल्याने पित्यानच आपल्या मुलाला नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना  समोर आली आहे.  या प्रकरणी पोलिसांनी पित्याला अटक केली आहे. सिकंदर हुसेन मुल्ला असं ४८ वर्षीय पित्याचं नाव असून अफान सिकंदर मुल्ला असं नदीत फेकलेल्या ५ वर्षांच्या चिमुकल्याचं नाव आहे.  सिकंदरनं आपल्या पाच वर्षांच्या चिमुकल्याला पंचगंगा नदीत (Panchganga river) फेकल्याची माहिती दिली असून त्यानुसार मुलाचा शोध घेतला जात आहे.

प्रकरण काय 
Related Posts
1 of 1,608

पाच वर्षांच्या अफानला फिट्स येण्याचा आजार आहे. सिकंदर हा मोलमजुरीचं काम करतो. शिवाय सिकंदर स्वत: दिव्यांग आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या कुटुंबात वाद सुरू आहेत. त्यातच दारूच्या नशेत तो अनेक वेळा घराबाहेरच राहत होता. त्याला एक दहा वर्षांची मुलगी आणि अफान अशी दोन मुले आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने औषधोपचाराच्या खर्चाच्या कारणावरून त्यांच्या घरी सतत वाद होत होता. मागच्या दोन दिवसांपासून सिकंदर घराबाहेर होता. त्यामुळे घरी परतताच त्याच्या पत्नीने त्याला चांगलेच सुनावले. तसेच, अफानच्या औषधोपरांवरून देखील त्यांच्यात वाद झाला. त्याच्या इतर कुटुंबीयांनी देखील त्याला सुनावलं. त्यामुळे सिकंदरला संताप अनावर झाला.

हे पण पहा  – Praniti Shinde | काँग्रेस आमदार प्रणिती शिंदें यांच्यावर गुन्हा दाखल

संध्याकाळी संतापाच्या भरात मुलाला उपचारांसाठी नेतो असं सांगून सिकंदर ५ वर्षांच्या अफानला घेऊन गेला. पण रात्री उशिरा घरी आल्यानंतर त्याने मुलाला पंचगंगा नदीत फेकल्याचे कुटुंबीयांना सांगितलं. हे ऐकून सिकंदरच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. या प्रकारानंतर सिकंदरची शिवाजी नगर पोलिसात तक्रार करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

फिल्म इंडस्ट्रीमधील आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीची आत्महत्या

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: