Drugs Case ,आर्यन खान येणार जेलमधून बाहेर , उच्च न्यायालयाने दिला निर्णय

0 290
 नवी मुंबई –  मुंबई मधील क्रुझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party)प्रकरणात ०२ ऑक्टोबर रोजी  एनसीबी (NCB) चे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पथकाने छापा टाकून बॉलीवूड(Bollywood) चा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात आर्यन खानला मुंबई सत्र न्यायालयाने जमीन देण्यास नकार दिला होता. या प्रकरणात आता पर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे. (Drugs case: Aryan Khan to be released from jail)
सत्र न्यायालयाने आर्यन खानचा जमीन अर्ज नामंजूर केल्याने आर्यन खानने आपला जमीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायलायत तीन दिवस या प्रकरणात सुनावणी झाली असून आज अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला जमीन मंजूर करण्यात आला आहे. आर्यन बरोबरच अरबाज मर्चंट आणि मुनमुम धमेचा  यांना देखील जमीन मंजूर झाला आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते.

 

Related Posts
1 of 1,677

 

समीर वानखेडे प्रकरणात मुंबई पोलिसांची एन्ट्री, नांगरे पाटीलांनी दिला “हा”आदेश

आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे न्यायालयात हजर आहेत. तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केलाय. आज एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल (ASG) अनिल सिंग यांनी बाजू मांडली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळून लावले होते. त्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली. त्यांच्या अर्जांवर २६ आणि २७ ऑक्टोबरला सुनावणी झाली. आज पुन्हा यावर सुनावणी होत आहे. दुसरीकडे एनडीपीएस न्यायालयात देखील या प्रकरणातील इतर आरोपींच्या जामीन अर्जांवर सुनावणी सुरू आहे. याच सुनावणीमध्ये दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Drugs case: Aryan Khan to be released from jail)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: