पुन्हा ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश, तब्बल 21 कोटीचा हिरोइन जप्त

0 222

 नवी मुंबई   बॉलीवूड (Bollywood)  किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan)  चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ला ड्रग्स (Drugs)  प्रकरणात अटक केल्यानंतर आता परत एकदा अँटी नार्कोटिक्स पथकाने  मुंबई मधील सायन परिसरात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका ड्रग्स तस्कर महिलेला अटक केली असून तिच्याकडून तब्बल 7 किलो हिरोइन जप्त करण्यात  आलं आहे.(Drug racket busted again, heroin worth Rs 21 crore seized)

पोलिसांनी जप्त केलेल्या हिरोइनची किंमत तब्बल 21 करोड इतके आहे. पोलिसांनी संबंधित ड्रग्स तस्कर महिलेला अटक केली असून तिची कसून चौकशी करण्यात येत आहे.  ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे राजस्थानातील प्रतापगढ परिसराशी जुळल्याची माहिती समोर आली आहे.

फेसबुक पोस्टवरून दोन गटात तुफान राडा, दगडफेक, चार पोलीस जखमी

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत NCB ने मुंबईत अनेक ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्कारांवर कारवाई केली आहे. संबंधित कारवाईत NCBने कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत. यानंतर आता मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने सायन परिसरात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पाळत ठेवून महिलेला ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलिसांनी महिलेची झडती घेतली असता, तिच्याकडे तब्बल 7 किलो हिरोइन सापडलं आहे. (Drug racket busted again, heroin worth Rs 21 crore seized)

 हे पण पहा  – Eid E Milad un Nabi Ahmednagar 2021

Related Posts
1 of 1,608
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: