ट्रक खड्ड्यात कोसळून चालकाचा मृत्यू
टाकळी गावातील दुबे वस्तीसमोर त्यांचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळला.

नगर : ट्रक खड्ड्यात कोसळून चालकाचा मृत्यू झाला. अहमदनगर- कल्याण महामार्गावर टाकळी खातगाव (ता.नगर) शिवारात बुधवारी (ता.१०) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
देशाच्या राजकारणाचे शरद पवार श्वास…
फिरोज चाँदभाई शेख (रा. टाकळी खातगाव) हे ट्रक (एमएच ४१ ए.जी. ८१७४) घेऊन अहमदनगरच्या दिशेने जात होते. टाकळी गावातील दुबे वस्तीसमोर त्यांचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांचा भाऊ अल्ताफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.