प्रारूप मतदारयादी अंतीम मतदार यादी करावी – नगरसेवक शामीर सय्यद

0 14

जामखेड – जामखेड नगरपरिषदेची सन २०२१ करीता प्रसिद्ध झालेली प्रारूप मतदारयादी बरोबर असून हरकतीच्या नावाखाली काही इच्छुक राजकीय दबाव प्रशासनावर आणून प्रसिद्ध होऊ घातलेली अंतीम मतदार यादी बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत याबाबत प्रशासनाकडे कागदपत्रे मागीतले असता देण्यास नकार देत आहेत यामुळे १५ माार्च रोजी प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादीत काही बदल झाल्यास राज्य निवडणूक आयोग व न्यायालयात जाण्याचा इशाार माजी नगरसेवक शामीरभाई सय्यद यांनी दिला आहे.

याबाबत पत्रकारांशी बोलताना शामीरभाई सय्यद म्हणाले, प्रभागनिहाय अंतिम याद्यांमध्ये  प्रभाग क्रमांक ६ व ७ सह शहरातील अनेक प्रभागात मोठ्या प्रमाणावर घोळ करण्यात आला आहे. मतदार याद्या बाबत आधिकारी राजकीय दाबाखाली काम करत असुन मोठय़ा प्रमाणावर आर्थिक घोडेबाजार करून राजकीय दबावाखाली काही इच्छुकांच्या हितासाठी आधिकारी आर्थिक घोडेबाजार करून काम करत असल्याचा आरोप  शामीरभाई सय्यद यांनी केला.

लग्न समारंभांवर श्रीगोंदा पोलिसांची आता करडी नजर

अधिका-यांचा मनमानी कारभार  राजकीय व आर्थिक दबावाखाली अंतिम मतदार यादी बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे याबाबत जिल्हाधिकारी, आमदार रोहित पवार, प्रांताधिकारी, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांना निवेदन देण्यात आले आहेत. निवेदनात म्हटले आहे की हरकतीदार व नागरिकांना २०१५ च्या अधिप्रमाणित मतदार यादीप्रमाणे सध्याच्या मतदार याद्या होतील असे तोंडी जाहीरपणे सांगितले होते. मात्र मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते हे कोणालाही न जुमानता मनमानीपणे मतदार याद्या करत आहेत.

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या या मंत्र्याचे नाव चर्चेत मात्र … 

Related Posts
1 of 1,290
 प्रभाग क्रमांक ६ व ७ मधील मतदार याद्यांवर घेतलेल्या हरकतींवर संबंधित अधिकारी कोणतेही समाधानकारक उत्तर देत नाहीत. हरकती घेऊन मंजुर केल्या मात्र त्यावर सुनावणी नाही, उपस्थित केलेल्या प्रश्नांची सोडवणूक नाही, हरकतीदारांशी चर्चा नाही, कोणाचेही म्हणने ऐकुन घेतले जात नाहीत. स्पाँट पंचनाम्याचा केवळ देखावा करत आहेत, वर्षानुवर्षे एका ठिकाणी रहीवास करत त्याच प्रभागातुन मतदान करत असलेल्या अनेक नागरिकांचे कुटुंबांतील व्यक्तींचे नावं राजकीय दबावाखाली काही इच्छुकांच्या सांगण्यावरून आधिका-यांनी दुसर्‍या प्रभागातुन ६ व ७ मध्ये घुसवले जात आहेत. प्रारूप मतदार यादीत समाविष्ट असलेली नावे इतर प्रभागात घुसवली जात आहेत. स्वतः मतदारांनी केलेल्या तक्रारीची दखल न घेता हेच बरोबर आहे असे नियमबाह्य मनमानी उत्तर आधिकारी देतात. सदर निवडणूक २०१५ च्या अधिप्रमाणित मतदार यादीप्रमाणे व्हावी.
अंतिम यादी प्रसिद्ध करण्यापुर्वी आमच्या हरकतींवर काय बदल, कारवाई केली त्याची आम्हाला पुर्व कल्पना द्यावी. अनेक वेळा मागणी करूनही शासनाच्या नियमानुसार मागितलेल्या माहीतीची फी भरण्यास तयार असुनही ती दिली नाही. ती माहिती द्यावी. नव मतदारांच्या नावाव्यतिरिक्त कोणत्याही नावांचा प्रभागात समावेश नियमबाह्य करू नये. असे न झाल्यास सदर निवडणूक बेकायदेशीर ठरेल  असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: