माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल – चंद्रकांत पाटील

0 438

पुणे –  भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांनी पुणे येथे केलेल्या एका विधानांमुळे परत एकदा राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात स्फोट होणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले आहे.

 पिंपरी चिंचवड जवळील देहूगाव मधील एका खाजगी कार्यक्रमात मंचावरुन सूत्रसंचालकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला तेंव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात तीन दिवसांत संभाव्य भूकंप होणार असल्याचे संकेत पाटलांनी दिले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं.

धक्कादायक! चार वर्षीय मुलावर १२ वर्षीय मुलाचा अनैसर्गिक अत्याचार

Related Posts
1 of 1,635

चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे मात्र राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. तसंच पाटील यांच्या वक्तव्यानंतर तर्क-वितर्कांना उधाण आलंय. पाटील यांच्या बोलण्याच्या नेमका काय अर्थ असावा, याचे राजकीय कंगोरे उलगण्याचा बरेच जण प्रयत्न करत आहेत. देहूत एका खाजगी दुकानाचे पाटलांच्या हस्ते उद्घाटन पार पडत होते. तेव्हा मंचावरील व्यक्ती वारंवार माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख करत होती. तेव्हा ते पाटलांना माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल,असं सूचक विधान करून चर्चेला उधाण आला आहे.

हे पण पहा –  Pimpri Chinchwad | दुकान मालकावर कोयत्याने सपासप वार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: