30 वर्षांपासून संस्थेवर वर्चस्व पिंपरखेड सेवा संस्थेत जनशक्तीचा विजय धनशक्ती पराभूत

0 195

 

अशोक निमोणकर
जामखेड – पिंपरखेड सेवा संस्थेच्या निवडणुकीत पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुशराव ढवळे यांच्या
जनसेवा शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला. या निवडणुकीत विरोधकांनी धनशक्तीचा वापर केला तसेच आमचे उमेदवार फोडण्याचे काम केले पण तीस वर्षांच्या काळात संचालक मंडळ, सचिव यांनी केलेल्या कामामुळे शेतकरी सभासदांनी धनशक्तीला डावलून जनशक्तीला साथ देऊन सर्व तेरा उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी केले. यापुढे असेच पारदर्शक काम करू असे आश्वासन पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुशराव ढवळे यांनी दिले. या निवडणुकीत पिंपरखेडचे हॅटट्रिक सरपंच व भाजप तालुकाध्यक्ष बापूराव ढवळे यांचा व पॅनेलचा दारूण पराभव झाला.

 

पिंपरखेड सेवा संस्थेची निवडणूक गुरवार रोजी झाली. या निवडणुकीत ९० टक्के मतदान झाले. व त्याच दिवशी संध्याकाळी चार वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुशराव ढवळे यांच्या मंडळाने जनसेवा शेतकरी विकास पॅनेलने सुरवातीपासून आघाडी घेऊन ती कायमस्वरूपी टिकवून दणदणीत विजय मिळविला. पिंपरखेड ग्रामपंचायतचे हॅटट्रिक सरपंच व भाजप तालुका उपाध्यक्ष बापूराव ढवळे हे स्वताहा पराभूत झाले तसेच सर्व पॅनेलचा दारूण पराभव झाला.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
१) पांडुरंग विठ्ठल ढवळे ४४५, २) भगवान आप्पा ओमासे ४४३, ३)आनंदराव सुभेदार भापकर ४३४, ४) दगडू आंबादास कदम ४३१, ५) शिवाजी मथुरदास ढवळे ४३१,६) मोहन रंगनाथ शिंदे ४१५, ७) रहीमान महेबूब शेख ४१४, ८) दगडू आंबादास कदम ४३४ ९)दगडाबाई नवनाथ ढवळे ४७१, १०) गजराबाई सुदाम लबडे ४४६, ११) करीश्मा रवींद्र रोही ४५७, १२) संभाजी ज्ञानदेव कारंडे ४७५, १३) संभाजी तानाजी सातपुते ४६०

 

Related Posts
1 of 2,139

सेवा संस्थेचा निवडणूकीचा निकाल दृष्टीक्षेपात येताच मंडळाच्या नेते व कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष केला व फटाक्याची आतषबाजी करीत विजय साजरा केला. माजी सभापती अंकुशराव ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पॅनेल मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाला यामुळे सर्वच कार्यकर्त्यांनी याचे पडसाद मिशन ग्रामपंचायत सत्तांतर, जि. प. व पं. स. निवडणूक योजना असल्याचे सांगितले. बाजार समितीचे संचालक करण ढवळे यांनी सोसायटीच्या निवडणुकीत मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद मतदारांनी मंडळ विजयी होण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल जाहीर आभार व्यक्त केले.

निवडणूक यशस्वी पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी देवीदास घोडेचोर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश मुंडे यांनी काम पाहिले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: