घरगुती गॅस सिलिंडरचा होतोय व्यावसायिक कामासाठी वापर !

0 16

श्रीगोंदा –  श्रीगोंदा शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रासपणे व्यावसायीक कामासाठी वापर केला जात आहे. परंतु, या प्रकाराकडे तहसील प्रशासनाच्या पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे श्रीगोंदा तहसीलदार नेमके कश्याची वाट पाहत आहेत असे जनमाणसातुन बोलले जात आहे .

                      भिंगार पोलीस ठाण्याला पोलीस अधीक्षका दणका, पाटील . दादा आखेर सुट्टी वर

शासनाच्या वतीने उज्ज्वला गॅस योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून गरीब कुटुंबांना मोफत गॅस जोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश कुटुंबाकडे गॅस कनेक्शन आहेत. मात्र, ९०० रुपयांपर्यंत गॅस सिलिंडरची किंमत असल्याने तो गरीबाला परवडणारा नाही. त्यामुळे अजुनही बरेच कुटुंब चुलीचा वापर करतात .

 सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आधीच सर्व जबाबदारी दिली असती तर आज हे कटू प्रसंग उद्भवले नसते

Related Posts
1 of 1,291

लाल रंगाचे गॅस सिलिंडर घरगुती वापरासाठी तर निळ्या रंगाचे गॅस सिलिंडर व्यावसायीक वापरासाठी आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरवर शासनाचे अनुदान आहे.गॅस सिलिंडर दरात मोठी वाढ झाल्याने ग्रामीण भागात अनेक गोरगरीब कुटुंब गॅस वापरत नाही. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील व शहरातील घरगुती गॅस सिलिंडर अवैधरित्या हॉटेल्स, ढाबे, खानावळी, चहाचे स्टॉल आदी व्यावसायीक ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत आहे. परंतु, या प्रकाराकडे तहसील प्रशासनाच्या पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे श्रीगोंदा तहसीलदार नेमके कश्याची वाट पाहत आहेत असे जनमाणसातुन बोलले जात आहे .

 तरुणीने इंस्टाग्राम वर केली अनोळखी तरुणाशी मैत्री, त्याला दिली आपल्या घराची डुप्लिकेट चावी आणि मग…..

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: