डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण, ८८५ पानांचे आरोपपत्र दाखल

0 201

नवी मुंबई –  सप्टेंबर महिन्यात डोंबिवली परिसरात ( Dombivli area) एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 नराधमांनी सामूहिक बलात्कार (Gang rape) केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यासह संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. या घटनेच्या आता पोलिसांनी तपास पूर्ण केला असून या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी (Manpada police) दोषारोपपत्र (chargesheet) कल्याण जिल्हा न्यायालयत सादर केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी 885 पानांचे दोषारोपपत्र दाखल केला असुन या प्रकरणाचा तपास करताना 121 साक्षीदरांचे जबाब नोंदवले आहेत. (Dombivali gang rape case, 885 page chargesheet filed)

मानपाडा पोलिस ठाण्यात 376, 376 (एन), 376 (3), 367 (ड) (अ) सह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.  या गुह्यातील 33 आरोपींना अटक करण्यात आली आहे. चार आरोपी अल्पवयीन असल्याची माहीती दोषारोपपत्रत दिली आहे. पिडीतेवर डोंबिवलीसह बदलापूर, रबाळे, मुरबाड येथे सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. त्याबाबतचा घटनास्थळी पंचनाम्याचा उल्लेख दोषारोपपत्रत नमूद आहे.

बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच घेताना महिला पोलीस उपनिरीक्षकाला अटक

Related Posts
1 of 1,603

या घटनेप्रकरणी राज्यातील विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. बलात्कार प्रकरणातील आरोपी सुटता कामा नये, त्यांना कठोर शिक्षा व्हावी, लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.(Dombivali gang rape case, 885 page chargesheet filed)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: