टाकळी कडेवळीत येथे कुत्र्याने उकरला शीर नसलेला मृतदेह

0 31

 श्रीगोंदा-   तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे एका पुरुषाचा शीर  नसलेला  मृतदेह कुत्र्याने उकरून काढला. खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा मृतदेह पुरला असण्याची प्राथमिक शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली.

टाकळी कडेवळीत गावापासून काही अंतरावर असणाऱ्या माळरानावर आज (८) सायंकाळी कुत्र्यांनी एक मृतदेह उकरून काढला ही बाब आजूबाजूच्या रहिवाशांच्या लक्षात आल्याने त्यांनी श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क करून माहिती दिली. तहसीलदार प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पुरलेला मृतदेह बाहेर काढला. पुरलेला मृतदेह पुरुषाचा असून त्याचे मुंडके घटनास्थळी आढळुन आले नाही. त्याच्या अंगात निळ्या रंगाचा शर्ट असून राखाड्या रंगाची पॅन्ट आहे. मयत पुरुष उंच असून मजबूत शरीरयष्टी आहे. मृतदेहाचे धड घटनास्थळी आढळून आले नसल्याने हा खुनाचाच प्रकार असण्याची अधिक शक्यता आहे.
दरम्यान या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. हा मृतदेह खून करून पुरला का? या मृतदेहाला इथे आणून पुरले? खुन झाला असेल तर कोणत्या कारणातून झाला या सर्व प्रश्नांची उकल पोलीस यंत्रणेला करावी लागणार आहे.

                        जर ऑपरेशन लोटस झाले तर राज्यात भाजपचा राहणार नाही – नाना पटोले

Related Posts
1 of 1,301
 शवविच्छेदन अहवालानंतर अधिक स्पष्टता 
दरम्यान घटनास्थळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितीन खामकर, डॉ. संघर्षशील राजुळे हे दाखल झाले आहेत.मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर वस्तुस्थिती समोर येणार आहे.

सरकारी वकीलच्या घरी भरदिवसा चोरी करून चोरट्यांनी लंपास केले 50 तोळे सोने

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत या ठिकाणी शीर नसलेला मृतदेह मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती त्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरू लागल्या नंतर आज दिनांक ०९ फेब्रुवारी रोजी पोलिस उपाधीक्षक सौरभ अग्रवाल तसेच विभागीय पोलिस उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव तसेच पोलिस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: