गांजा आणि तंबाखूमधील एनसीबीला फरक कळतो की नाही ? – नवाब मलिक

0 309
नवी मुंबई –   राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (National Spokesperson Nawab Malik)  यांनी परत एकदा पत्रकार परिषद घेऊन एनसीबी (NCB) वर टीका केली आहे. नवाब मलिक यांनी नसीबीला हर्बल तंबाखू आणि गांजा यातील फरक कळतो की नाही? असा प्रश्न या पत्रकार परिषदेतमध्ये उपस्थित केला आहे.  माझ्या जावयाकडे कोणत्याही प्रकारचा गांजा आढळून आला नाही. जावयाकडे हर्बल तंबाखू सापडल्याचं कोर्टाच्या ऑर्डरमध्ये दिसून आलं आहे. या प्रकरणात माझ्या जावयाला फ्रेम करण्यात आलं असून याप्रकरणी माझा जावई उच्च न्यायालयात जाणार आहे, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.(Does NCB know the difference between marijuana and tobacco? – Nawab Malik)

नवाब मलिक यांनी आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेत त्यांनी जावई समीर खान यांच्या अटक प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपावरून पर्दाफाश करत एनसीबीवर टीका केली आहे.

एनसीबीच्या छाप्यात 200 किलो गांजा मिळाला नाही. साडेसात ग्रॅमचा गांजा फर्निचरवालाकडे मिळाला. बाकी सर्व गोष्टी हर्बल टोबॅको आहेत हे रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्य आहे. अशा संस्थांकडे इन्स्टंट लेव्हलला टेस्ट करण्याचे किट्स असतात. गांजा नसतानाही लोकांना फ्रेम करण्यात आलं. हे मी सांगत नाही तर कोर्टाचा रिपोर्ट सांगत आहे. 27 अ हे कलम लागू होत नाही. जो काही खटला फर्निचरवाल्यावर लागतो. पण त्याला लगेच जामीन दिला. हर्बल तंबाखू सापडल्यानंतरही लोकांना फ्रेम केलं जात आहे. सिलेक्टिव्ह खबर लिक करून लोकांना बदनाम करण्याचं काम एनसीबी करत आहे. एनसीबी फ्रेम करण्याचं काम करत आहे. एनसीबी फर्जिवाडा करत आहे, असंही मलिक यांनी सांगितलं.

 नवाब मलिक यांनी या पत्रकार परिषदेत सुरुवातीपासूनचा घटनाक्रमच सांगितला. 6 तारखेला आम्ही एनसीबीबाबत काही सवाल उपस्थित केले होते. केपी गोसावी, मनिष भानुशालीवर बोललो होतो. त्यावेळी मला माझ्या जावयाविषयी विचारलं होतं. 13 जानेवारीला माझे जावई समीर खानला अटक झाली. तेव्हाही मी मीडियाला सांगितलं होतं की, कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. कायदा आपलं काम करेल. देशाच्या न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे. गेल्या पत्रकार परिषदेतही हेच सांगितलं होतं. मात्र, तरीही भाजप नेते माझ्या जावयाची बदनामी करत होते. मलिक यांचे जावई ड्रग डिलर आहेत. अटक झाल्याने सूडापोटी एनसीबीला बदनाम करत आहेत, असं भाजप नेते सांगत होते, असं त्यांनी सांगितलं.

Related Posts
1 of 1,654

हे पण पहा –  जमीर इनामदार यांचे हृदय विकराच्या झटक्याने निधन | देशसेवेत कार्यरत असताना निधन

27 तारखेला एनडीपीएसच्या स्पेशल कोर्टाने समीर खान आणि दोघांना साडे आठ महिने तुरुंगात राहिल्यानंतर जामीन दिला. त्यानंतर आमची पत्रकार परिषद झाली. मात्र, रिटर्न ऑर्डर आम्हाला मिळाली नव्हती. काल सकाळी 11 वाजता कोर्टाच्या पोर्टलवर जस्टीस जोगळेकरांची ऑर्डर लोड झाली. त्यानंतर आम्ही ती वाचली. त्यात जावयाकडे गांजा सापडला नसल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. मात्र, दरम्यानच्या काळात जावयाला तुरुंगात राहावं लागलं. माझी मुलगी ट्रॉमात होती. त्यांच्या मुलावर परिणाम झाला. ते समाजात कुणाला भेटू शकत नाही. ते केवळ माझ्या घरी किंवा माझ्या दुसऱ्या मुलीला भेटते. अशी परिस्थिती आहे, असं मलिक म्हणाले.(Does NCB know the difference between marijuana and tobacco? – Nawab Malik)

पालकमंत्री सध्या किती पैसे आले आणि किती पैसे गेले याचा शोध घेत आहेत – सुजय विखे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: