कोरोना नसतानाही ब्लॅक फंगस होतो का ?  जाणून घ्या संपूर्ण माहिती 

0
नवी मुंबई –  एकीकडे राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव सध्या कमी होताना दिसत आहे. राज्यात वीस ते तीस हजार दरम्यान कोरोनाबांधीत रुग्णांची आता दिवसाला नोंद होत आहे. तर दुसरीकडे आता कोरोना रुग्णांमध्ये म्युकर मायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसच्या रुग्णांची जास्त प्रमाणत नोंद होत आहे.  ब्लॅक फंगसच्या वाढत्या रुग्ण संख्या पाहुण देशातील १४ राज्यांनी या आजाराला महामारी घोषित केली आहे.
ब्लॅक फंगस हा रोग फक्त कोरोनाच्या रूग्णांनाच होतो, असे नाही तर ब्लॅक फंगस कोरोना नसलेल्या व्यक्तीला देखील होऊ शकतो. यामुळे धोका अधिक वाढला आहे. विशेष करून या ब्लॅक फंगसचा सर्वाधिक धोका हा ब्लड शुगर असलेल्या व्यक्तीला आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल (Dr. VK Paul ) यांनी म्हटले आहे की, ब्लॅक फंगस कोविडच्या आधीही होतो. मधुमेहाच्या रुग्णांना देखील ब्लॅक फंगस होऊ शकतो. ज्यांचा मधुमेह कंट्रोलमध्ये नाही अशा व्यक्तींना या संसर्गाचा धोका अधिक आहे. म्हणून यादरम्यान मधुमेह असलेल्या रूग्णांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

आपल्या पतीच्या मदतीने सुनेनं केला सासूचा गळा आवळून खून

मधुमेहाच्या रूग्णांना जास्त धोका
डॉ. पॉल म्हणाले की, ज्यांच्या साखरेची पातळी 700 ते 800 पर्यंत पोहोचते, ज्याला मधुमेह केटोएसिडोसिस देखील म्हटले जाते. त्यांना ब्लॅक फंगसचा धोका असू शकतो. लहान मुलापासून वृद्धांपर्यंत कोणालाही ब्लॅक फंगस होऊ शकतो.
Related Posts
1 of 1,171
तर एम्सचे डॉ. निखिल टंडन ( Dr. Nikhil Tandon) म्हणाले आहेत की, निरोगी लोकांना या संसर्गाची चिंता करण्याची गरज नाही. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे, त्यांना फक्त जास्त ब्लॅक फंगसचा धोका आहे. डॉ. टंडन पुढे म्हणाले की, कदाचित कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने रोगप्रतिकारक शक्तीला पहिल्यापेक्षा जास्त आक्रमण केले असेल, ज्यामुळे ब्लॅक फंगसच्या केस पुढे आल्या. मात्र, सध्या यावर काही जास्त बोलताना येणार नाही. तोपर्यंत योग्य तपासणी होणार नाहीत.

फेसबुकवरून ओळख झालेल्या व्यक्तीकडून तरुणीवर अत्याचार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: