खजिना मिळवा म्हणून डॉक्टर पती ने दिली आपल्या बायकोची बळी

0 382

बंगळुरु-   नऊ महिन्यांपूर्वी दावणगेरे जिल्हयात झालेल्या काळ्या जादू प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) एकाला अटक केली करून एक धक्कादायक खुलासा केला आहे . इंजेक्शनमधून औषधाचा तीव्र डोस देऊन पत्नीची हत्या केल्याबद्दल एका डॉक्टरला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात पोलिसानी एका 45 वर्षीय मेडिकल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉ. चन्नकेशप्पा याला अटक केली आहे.  (The doctor’s husband sacrificed his wife to get the treasure)

डॉ. चन्नकेशप्पाची पत्नी शिल्पाच्या मृत्यूनंतर तिच्या पालकांनी 11 फेब्रुवारी रोजी दावणगेरे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारीत तिच्या पालकांनी आपल्या मुलीचा मृत्यू हा अपघात नसून नियोजनबद्ध खून असल्याचा दावा केला होता. सुरुवातीच्या तपासादरम्यान, डॉक्टर त्याच्या पत्नीला कमी रक्तदाबाचा त्रास असल्याचा दावा करुन आपली अटक टाळली होती.

हे पण पहा – येसवडी गावातील अनाधिकृत हातभट्टी आणि दारु विक्रीवर कारवाई व्हावी

Related Posts
1 of 1,608

य प्रकरणात पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले कि या प्रकरणाच्या अधिक तपासादरम्यान, असे आढळून आले की चन्नकेशप्पा गेल्या एक वर्षभरापासून वारंवार ‘काळी जादू’ करणाऱ्या मांत्रिकाला भेटत होता. यादरम्यान त्याला खजिना मिळवायचा असेल तर पत्नीचे ‘बलिदान’ द्यावे लागेल, असा सल्ला देण्यात आला. खजिन्याच्या लालसेपोटी 11 फेब्रुवारी रोजी चन्नकशप्पाने शिल्पाला डेक्सामेथासोनचा डोस दिला, त्यानंतर ती आजारी पडली आणि रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. (The doctor’s husband sacrificed his wife to get the treasure)

पाथर्डीमध्ये शून्य तर जिल्हयात आज इतक्या रुग्णांची नोंद …..

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: