संकटात जिल्हा वाऱ्यावर , मंत्रीपद पक्षासाठी की जनतेसाठी ?

0 190

अहमदनगर-    जिल्हयात महाविकास आघाडी सरकारमधील तीन मंत्री आणि पालकमंत्री असे एकूण चार मंत्री आपल्या या अहमदनगर जिल्ह्याला लाभले आहे. मात्र चार मंत्री असताना ही या जिल्ह्यातील नागरिकांच्या संकटात आधार देण्यासाठी मंत्र्यांकडे वेळ नाही हे दुर्दैव. जिल्ह्यातीलकाही तालुक्यांमध्ये ओला दुष्काळाची परिस्थिती असल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आता पर्यंत आश्वासनाशिवाय काहीच प्राप्त झालेला नाही.

एकीकडे जिल्ह्यातील मंत्री आपला पक्ष वाढविणायसाठी जिल्ह्यात संपर्क अभियान सुरु करत आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील शेतकरी संकटात आहे. अशावेळी मंत्रीपद हे पक्षासाठी असतं की जनतेसाठी ?  अशा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे.  जिल्ह्यात काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) , राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure)  आणि शिवसेनेकडून शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh)  यांना मंत्रिपदाची जबाबदारी मिळलेली आहे.
बाळासाहेब थोरात यांच्याकडे महत्वाचा महसूल विभाग असल्याने त्यांना जिल्ह्यात दौरे करण्याबाबत काही मर्यादा येत असतात मात्र जनता संकट असता त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करणे अपेक्षित होतं. आपला मतदारसंघ वगळता थोरात जिल्ह्यात इतर तालुक्यांना फारसा वेळ देताना दिसत नाहीत. तर राहूचे आमदार प्राजक्त तनपुरे हे प्रथमच आमदार झाले आणि त्यांना मंत्रिपद मिळाले. त्यामुळे अशी परिस्थिती कशी हाताळावी याचाही अनुभव त्यांना नाही त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली अधिकाऱ्यांची बैठक घेतली अहवाल पाठवतो एवढंच ते म्हणतात. तनपुरे हे त्यांचा राहुरी मतदारसंघ आणि नगरशहर वगळता इतर तालुक्यात फारसे दौरे करताना दिसत नाहीत.  शंकराव गडाख हे अपक्ष निवडणूक लढून शिवसेने त्यांना मंत्रिपद दिले त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला शंकराव गडाख यांनी शिवसेनेला बळकटी देण्याचा दृष्टीने जिल्ह्यात प्रयत्न सुरू केले आहेत.  मतदार संघ व इतर तालुक्यात असेल दोन्हीकडे त्यांनी शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे पक्षी वाढवणे किंवा अभियान करणे यात काही गैर नाही मात्र जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ओला दुष्काळाची परिस्थिती असतानी शेतकरी संकटामध्ये असतानासुद्धा त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी वेळ नाही किंवा त्यांची परिस्थिती पाहण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही.
Related Posts
1 of 1,635
पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif)  हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.  सर्वात अनुभवी आणि राजकारणात मुरब्बी असलेले आणि हसन मुश्रीफ यांचा जिल्ह्याला चांगला फायदा होईल असे वाटले होते मात्र तसे होताना दिसत नाही आधीच ते अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेण्यास फारसे उत्सुक नव्हते तरीही त्यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद गेले त्यामुळे ते पंधरवड्यातून अथवा महिन्यातून एक दिवसाचा जिल्हा दौरा करतात. अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या मंत्र्यांचे जनतेकडे पाठ फिरवली असेल तर दुसऱ्यांकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: