महसूलमंत्री थोरात यांच्या उपस्थितीत शनिवारी अहमदनगर येथे जिल्हा काँग्रेसची बैठक

0 202
District Congress meeting at Ahmednagar on Saturday in the presence of Revenue Minister Thorat
अहमदनगर –  उदयपूर येथे झालेल्या शिबिराअंतर्गत भारत जोडो अभियान व इतर महत्त्वाच्या गोष्टींबाबत जिल्हा व तालुका पातळीवरील सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), आमदार डॉ. सुधीर तांबे व आमदार लहू कानडे यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक 28 मे 2022 रोजी दुपारी 2 वा. कालिका प्राइड अहमदनगर येथील जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके व शहराध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सांगण्यात आले आहे की, उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय चिंतन शिबिरात मधून जाहीर झालेल्या भारत जोडो अभियान हे गाव पातळीवरील बुथ स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी व या अभियानातील शिबिराचा कार्यक्रम गावोगाव देण्यासाठी तसेच आगामी काळातील वाटचालीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे विधिमंडळ नेते व राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. तांबे, आमदार कानडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आजी-माजी आमदार ,खासदार व पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Related Posts
1 of 2,357
 तरी या बैठकीसाठी सर्व तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समन्वयक ज्ञानदेव वाफारे व अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: