
नगर:- अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर रोडवर हॉटेल गारवा समोर आरटीओ (RTO) विभागातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक चेतन दिलीप दासनूर, विलास धूम व वाहन चालक देवराम गीते असे मिळून विनापरमिटच्या वाहनांवर ता.११ मे रोजी कारवाई करत असताना हॉटेल गारवा समोर दोन अनोळखी व्यक्ती आले व कारवाई करत असताना त्याची शुटिंग करू लागले.
तर आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न सुटू शकला असता. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अजित पवार म्हणाले,
तेव्हा चेतन दिलीप दासनूर यांनी त्यांना विचारणा केली असता ते दोघे म्हणाले की, तुम्ही मुद्दाम गरिबांना त्रास देता, तुम्ही असेच मरणार, असे म्हणून अंगावर धावून आले व सरकारी कामात अडथळा निर्माण केला. दोन्हीही व्यक्ती दारूच्या नशेमध्ये होते. त्यानंतर ते दोघेही ह्युंदाई चार चाकी गाडीमध्ये तेथून निघून गेले. चेतन दासनूर यांनी तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.