DNA मराठी

खासदार विखे यांच्या मदतीची चर्चा

खासदार डॉ. सुजय विखे पाटील रात्री मुंबईत ज्येष्ठ नागरिकांच्या एका चारचाकीला धक्का मारताना दिसले.

0 18

मुंबई : खासदार विखे यांच्या मदतीची चर्चा . खासदार डॉ. सुजय विखे पाटील (MP Sujay Vikhe)रात्री मुंबईत ज्येष्ठ नागरिकांच्या एका चारचाकीला धक्का मारताना दिसले. कल्याणमधील एका अभियंत्याने हे दृष्य टिपून सोशल मीडियात पोस्ट केले आहे. आपल्या मतदारसंघात प्रवास करताना रस्त्यात अडचणीत सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीला लोकप्रतिनिधी धावून गेल्याचे अनेकदा पहायला मिळते. मात्र, मुंबईसारख्या शहरात बाहेरच्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधीने धावून जाणे विरळच. असाच प्रकार रात्री मुंबईत घडला आहे.

सत्तेच्या नशेत नेत्यांकडून गैर कृत्यांचे प्रकार वाढ, राजकारणात डागाळलेली नेते, तरीही मी तो नव्हेच.

केतन भोई या कल्याणमध्ये राहणार्‍या अभियंत्याने ही पोस्ट केली आहे. भोई यांचे शिक्षण नगरच्या विखे पाटील (MP Sujay Vikhe) अभियांत्रिक महाविद्यालयात झाले आहे. त्यामुळे त्यांनी खासदार डॉ. विखे पाटील यांना ओळखले. भोई पोस्टमध्ये म्हणतात, ऑफिस संपल्यानंतर कॅबने घरी जात असताना अंधेरी येथे तिघेजण एका चारचाकीला धक्का देताना दिसले. मुंबईत असे प्रसंग फार कमी वेळा दिसतात. त्यामुळे कुतूहलाने बघत होतो. तेवढ्यात लक्षात आले की अरे यात मध्यभागी तर नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आहेत. पटकन फोटो काढायचा प्रयत्न केला पण नीट फोटो घेता आला नाही. कुठलाही बडेजाव न करता नगरच्या बाहेर स्वतः रस्त्यावर उतरून एका अनोळखी व्यक्तीला मदत करणारे नगरचे खासदार आहेत, हे बघून अभिमान वाटला.

Related Posts
1 of 30

Surabhi Hospital’s :- सुरभीच्या अडचणीत वाढ…. संरक्षण विभागाचा ना-हरकत दाखला खरा नाही

खासदार डॉ. विखे पाटील दिल्लीला जाण्यासाठी मुंबईत विमानतळावर निघाले होते. रस्त्यात एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याची चारचाकी बंद पडली होती. रात्रीची वेळ असल्याने मदतीला कोणीही नव्हते. ते दोघेच प्रयत्न करीत असले तरी त्यांना यश येत होत नव्हते. हे पाहून खासदार डॉ. विखे पाटील (MP Sujay Vikhe) यांनी आपले वाहन थांबविले. त्यांच्यासोबत मोजके सहकारी होते. त्यामुळे ते स्वत: खाली उतरले व ज्येष्ठ नागरिकांच्या वाहनाला धक्का मारून त्यांची मदत केली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: