पोलिसांची आरोपीसोबत पार्टी प्रकरणात बनावट पुरावे तयार केल्याची चर्चा ?

0 236
Gutkha, pot, liquor sales in full swing, the world is ruined, the eyes of the police

 

श्रीगोंदा :- श्रीगोंदा पोलीस (Shrigonda Police) ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याने वॉरंट मधील अटक आरोपी सोबत पार्टी केल्याप्रकरणी खाते अंतर्गत चौकशी सुरू झाली असून यासाठी पुरावे म्हणून लागणारी सर्व कागदपत्रे बनावट कागदपत्रे तयार केली असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहेत त्यामुळे पोलिसांनी कागदपत्रे तपासून खातरजमा करण्याची गरज निर्माण झाली आहे . (Discussion between the police and the accused about fabricating evidence in the party case?)

श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या आदेशानुसार वॉरंट बजावणी साठी पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकेशकुमार बडे यांची नेमणूक करण्यात आली आहे त्या पोलीस कर्मचाऱ्याने एक वॉरंट  बजावणी साठी गेल्यावर आरोपीला अटक करण्यात आली रात्री उपचारासाठी दवाखान्यात नेण्याच्या नावाखाली कारागृहातून नेऊन त्याच्यासोबत पार्टी केल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून झळकल्या नंतर पोलिस प्रशासनाने तातडीने दखल घेतली व नाशिक परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांच्या आदेशाने मुकेशकुमार बडे यांची खातेतर्गत चौकशी सुरू करण्यात आली.
Related Posts
1 of 2,452
 त्यासाठी लागणारी हॉस्पिटल व इतर लागणारी सर्व बनावट कागदपत्रे तयार केली असल्याची चर्चा पोलीस ठाण्याच्या परिसरात ऐकण्यास मिळत होती व तीच कागदपत्रे चौकशी दरम्यान सादर होणार असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाली आहे त्यामुळे अधिकारी यांनी या सर्व कागदपत्रांची खातरजमा करून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.  (Discussion between the police and the accused about fabricating evidence in the party case?)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: