कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर थेट कोयत्याने हल्ला, गुन्हा दाखल

0 249

भंडारा –  घरगुती वादात  समुपदेशनासाठी (counseling) गेलेल्या पोलिसांवर तरुणाने कोयत्याने करून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील  लाखांदूर तालुक्यातील विरली बुज येथे सोमवारी रात्री ११. ३० च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी (police ) तरुणावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.  विशाल मनोहर तुमाने (वय ३८) अटकेतील तरुणाचे नाव आहे. (Directly attacking the police who went to settle the family dispute, filed a case)

या प्रकरणात मिळालेली माहिती अशी कि बावला हरिदास मोटघरे या वृद्धेने घरगुती वादावरून मुलगा आणि सुन मारहाण करीत असल्याची माहिती ११२ क्रमांकावर लाखांदूर पोलिसांना दिली. त्यावरुन आपातकालीन पोलीस वाहनासह पोलीस अंमलदार रवींद्र मडावी आणि सुभाष शहारे घटनास्थाळी दाखल झाले. वृद्धेच्या कुटुंबियांचे समुपदेशन आटोपून पोलीस वाहनाकडे जात होते. यावेळी विशाल दोन्ही हातात कोयता व चाकू घेवून गावातीलच अन्य एका व्यक्तीला शिविगाळ करुन खून करण्याची धमकी देत असल्याचा पोलिसांना आढळून आला.
त्यावरुन पोलिसांनी आरोपीला हटकले असता पोलिसांना शिवागळ व धक्काबुक्की करत हातातील कोयत्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. लाखांदूर चे पोलीस निरिक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमरदीप खाडे, पोलीस नाईक दिलीप भोयर, अंमलदार अनिल राठोड, अविनाश खरोले, मुलगिर, भुपेंद्र बावनकूळे आदी पोलिस अधिकारी कर्मचा-यांनी घटनास्थाळी जावून विशालला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र खुनी त्याने पोलिसांच्या अंगावर धावून जात शिविगाळ व धक्काबुक्की केली. यावेळी पोलिसांनी शिताफीने त्याच्या हातातील  हत्यार हस्तगत करीत ताब्यात घेतले. (Directly attacking the police who went to settle the family dispute, filed a case)
Related Posts
1 of 1,603
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: