… मंग त्यांची अक्कल मातीत गेली होती का ? – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

0 117

प्रतिनिधी – अशोक निमोणकर

जामखेड – सामाजिक न्याय खात्याच्या असलेल्या अनेक योजना आ. रोहीत पवार यांनी दोन वर्षांत सर्वात जास्त कर्जत जामखेडमध्ये आणल्या रोहयो कामाचा निधी जिल्ह्यातून सर्वात जास्त याच मतदारसंघात आणून नाशिक विभागात आघाडीवर आ.पवार यांनी आणला पण मागील दहा वर्षांपासून ज्यांनी प्रतिनिधीत्व केले त्यातील पाच वर्षे कॅबिनेट मंत्री राहीले त्यांनी या योजनांपासून लाभार्थ्यांना वंचीत ठेवले नाशिक विभागात खालून तिसरा नंबर आला मंग त्यांची अक्कल मातीत गेली होती का ? असा टोला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव न घेता मारला. तसेच राज्यातील पहिले संविधान भवन जामखेड मध्ये करण्याची घोषणा मंत्री मुंडे यांनी केली.

येथील राज लॉन्समध्ये आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून जामखेड तहसील कार्यालय आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या विशेष सहकार्यातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विशेष मोहीमेतील लाभार्थ्यांना लाभ मंजुरी आदेश वाटप कार्यक्रम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी आ. रोहीत पवार, प्रांताधिकारी डॉ. गणेश थोरबोले, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सभापती राजश्री मोरे, राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, मधुकर राळेभात, युवा नेते महेश राळेभात, अंजली ढेपे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, राज्यात सध्या कोणाचा भोंगा, कोन हनुमान चालीसा वाचणार ते त्यांना वाचता येईल का नाही ते माहीत नाही. हनुमान चालीसा वाचून आपल्या भाकरीचा प्रश्न मिटणार आहे का ? वातावरण एवढे तापवून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल यांचे वाढलेले भाव व वाढलेली महागाई याकडे दुर्लक्ष केले जाते हे दुर्दैव आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात जाती पातीचे राजकारण सहन केले जाणार नाही असा इशारा मंत्री मुंडे यांनी दिला.

Related Posts
1 of 2,452

दिलेल्या संविधानमुळे आपल्या सर्व हक्क अधिकार व स्वातंत्र्य मिळाले त्याबाबत आपल्याला सर्व प्रकारचे ज्ञान मिळावे यासाठी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी संविधान भवने उभारण्याचे महाविकास आघाडीचे धोरण असून याची सुरुवात जामखेड मधुन करण्यात येईल. त्या अंतर्गतच राज्यातील पहिले’संविधान भवन’ जामखेड मध्ये उभारण्यात येईल, ना.धनंजय मुंडे यांचे जाहीर आश्वासन दिले.

आ. रोहीत पवार म्हणाले, सरकारी योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत आणि व्यक्तीपर्यंत कसा पोहोचेल यासाठी अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही कायमच प्रयत्न करत असतो आणि यापुढेही प्रयत्न करत राहणार आहोत. तसेच जामखेड येथे बौध्द विहार, ग्रंथालय, समाजिक सभागृह हे याच ठिकाणी असावे यासाठी संविधान भवन उभारण्यासाठी निधी देण्याची मागणी केली मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली.

जामखेड येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रण देताना जयंती उत्सव समितीच्या वतीने राष्ट्रवादी परिसंवाद कार्यक्रमावेळी आ. रोहित पवार मागणी करण्यात आली होती की, बौद्ध विहार, ग्रंथालय, समाजिक सभागृह हे सर्व एकाच ठिकाणी असावे. त्याचवेळी दादांनी होकार दिला होता. या नुसार आज मंत्री महोदयांच्या समोर आ. तशी मागणी केली, त्यांनीही ताबडतोब संविधान भवन जाहीर केले.
या बद्दल ना. धनंजय मुंडे व आ.रोहित पवार यांचे तालुक्यातील बौद्ध समाजाच्या वतीने अभार प्रांत डॉ. अजित थोरबोले यांनी प्रास्ताविक केले तर आभार तहसीलदार योगेश चंद्रे यांनी मानले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: