सरकारने आमदार यादीतून राजू शेट्टींचं नाव मागे घेतला का ? जयंत पाटील म्हणाले …

0 320

चाळीसगाव   –  एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्तीसाठी करण्यात आलेली शिफारस राज्यसरकारने मागे घेतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने होत आहे.  माजी खासदार राजू शेट्टी यांनी या चर्चांवर आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे.  तर दुसरीकडे  विधानपरिषद(Legislative Council) चे १२ आमदारांच्या यादीतून कुणाचेही नाव वगळले नसल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री (Minister of Water Resources)  आणि  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (State President of NCP)   जयंत पाटील (Jayant Patil)  यांनी स्पष्ट केले आहे.जयंत पाटील यांनी नुकताच चाळीसगावसहीत पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या यादीत कुणाचेही नाव वगळण्यात आलेले नाही. आम्ही पुन्हा एकदा राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांना विनंती केलेली आहे. तीनही पक्षांच्या सहमतीनेचं राज्यपालांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावर राज्यपालांनी लवकर निर्णय घावा अशी अपेक्षा आहे. कारण लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले जात आहेत, असे महाराष्ट्रातील जनतेला आता वाटायला लागले आहे. बराच काळ झाला त्याच्यावरचा निर्णय येत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Related Posts
1 of 1,512

एकनाथ खडसे (Eknath Khadse)  यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर बोलतांना पाटील म्हणाले, ईडी या देशात विरोधी पक्षावर सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत असते.  कुणाची कोणतीही चूक नसतांना ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणाचा वापर विरोधी पक्षांना नामोहरम करण्यासाठी केला जातोय. त्यामुळे चूक नसतांना कारवाई करणे आणि बदनामी करणे किंवा प्रभावित करणे सूरु आहे.

“मी देखील करेक्ट कार्यक्रम करणार “, राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला इशारा

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: