सावेडीमध्ये पुन्हा धूम स्टाईलने चोरी

0 15

अहमदनगर –  अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात धूम स्टाईलने महिलांच्या दागिन्यांची चोरी करण्याचे प्रकार मागच्या काही दिवसांनी वाढले आहे. सावेडी उपनगरात नुकताच तीन ठिकाणी चोरी केल्यानंतर आता शनिवारी चोरट्यांनी पुन्हा धूम स्टाईलने एकदा चोरी केली आहे .

 शेतकऱ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी सरकारची आहे – शरद पवार

याबाबत मिळालेली माहिती अशी की दुपारी बाराच्या सुमारास प्रोफेसर कॉलनी रस्त्यावरील रेणुका माता मंदिर जवळ वैशाली विलास देशपांडे (वय ६० रा. प्रोफेसर कॉलनी रोड ) या महिलेचे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र लंपास करण्यात आले आहे .

                                                  अजित पवार यांच्याकडून व्यसनी लोकांचा समाचार

Related Posts
1 of 1,301

या प्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली व त्याचे पती विलास देशपांडे पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेले या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक रवींद्र पिंगळे करत आहे .

                              पोलीस ठाण्यातील डीबी पथके नावाला,पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: