रयत क्रांती संघटनेच्या जिल्हा सरचिटणीसपदी धारकर यांची निवड

0 194
Dharkar elected as District General Secretary of Rayat Kranti Sanghatana
 
श्रीगोंदा  :-  शिरसगाव बोडखा ग्रामपंचायत चे मा. सरपंच तेजमल झुंबर धारकर यांची रयत क्रांती संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाली. राज्य कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र मा. कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांचे हस्ते देण्यात आले.
Related Posts
1 of 2,352
शेतकरी आंदोलन, चळवळीत त्यांचा नेहमी सक्रीय सहभाग असतो. प्रगतशिल शेतकरी म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे. गावचे सरपंच असताना केलेली कामे, विविध कृषी प्रदर्शनातील सहभाग, कृषी मेळाव्यातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन , दांडगा जनसंपर्क या सर्वांची दखल घेऊन त्यांची सरचिटणीस पदी निवड झाली.

 

यावेळी भारतीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव नाना काळे, रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब मांडे, तालुकाध्यक्ष संतोष ढगे, युवा तालुकाध्यक्ष मच्छिंद्र जठार, अमोल गायकवाड, रवी सरोदे, श्रीकांत शिंदे, योगेश सरोदे उपस्थित होते. या निवडीबद्दल  सहकारमहर्षी नागवडे साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे, व्हा.चेअरमन बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे, मा. आमदार राहूल दादा जगताप , राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते घन :शाम आण्णा शेलार यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: