
ते म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायतीपासून ते महानगर पालिकेपर्यंत तीन टक्के मिळणारा निधी त्यांना मिळत नाही हा त्यांचा आरोप आहे. परंतु, मी या विभागाचा मंत्री झाल्यापासून फार सुधारणा झाल्यात. ज्या संस्था पैसे आपल्याकडे ठेवायच्या आणि दिव्यांगाना द्यायच्या नाहीत, त्यांना असं सांगण्यात आलं आहे की त्यांना ते पैसे दिले पाहिजेत.
मी आत्ता तुमच्यासमोर या विभागाच्या आयुक्तांना सांगतो अशा संस्थांना खड्यासारखे बाजूला काढा आणि दिव्यांग व्यक्तीचे पैसे त्यांना द्या. त्यामुळं दिव्यांग व्यक्तींनी झालेला गैरसमज दूर करावा. दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी किरीट सोमय्या यांच्यावर प्रश्न विचारताच धनंजय मुंडे यांनी हात जोडून बोलण्यास नकार दिला.