शनी देव दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा जिल्हयात भीषण अपघात; एकाचा मुत्यू

0 318
Devotees going for Shani Dev Darshan have a terrible accident in the district; Death of one
अहमदनगर  – जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर येथील भाविक तुळजापूर देवदर्शन (Tuljapur Devdarshan) करून नगर औरंगाबाद रोडने शनिशिंगणापूर (Shanishinganapur) येथे देवदर्शनासाठी जात असताना दि. 27 मे रोजी पहाटेच्या सुमारास पांढरीपुल येथे क्रुझर व ट्रकचा (cruisers and truck) भीषण अपघात (Accident) झाला . यामध्ये क्रुझर या चारचाकी वाहनांमध्ये असलेल्या शांताराम घन यांचा जागीच मृत्यू झाला.

 

Related Posts
1 of 2,197
या अपघातात श्रद्धा कैलास पवार (वय ३०), विकी नाना पाटील (वय २७), नंदा शांताराम घन (वय ३२), वेदांत शांताराम घन ( वय १४), खुशी शांताराम घन (वय ११), राजपाल अशोक पवार (वय १५), राजगुरू कैलास पवार ( वय २२), कैलास अर्जुन पवार ( सर्व रा. जामनेर तालुका जामनेर) हे जखमी झाले आहेत .

 

 

 तातडीने जखमी झालेल्या सर्व भाविक रुग्णांना उपचारासाठी शहरातील तारकपूर येथील सिटी केअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलचे संचालक डॉ.संदीप सुराणा यांनी तातडीने सर्व रुग्णांवर प्राथमिक उपचार केले अपघात झालेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: