
MLA Nilesh Lanka :- पारनेर :राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanka) यांच्या माध्यमातून वासुंदे गावात जवळपास १० कोटी रुपयांच्या वर विकास कामे झाली असून या पुढील काळात सुद्धा वासुंदे गावच्या विकास कामांसाठी आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ राणीताई लंके यांनी दिले आहे. मृदू व जलसंधारण खात्याच्या माध्यमातून वासुंदे गावातील शिर्केमळा येथील पाझर तलावासाठी आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या कामाचा शुभारंभ राणीताई लंके यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.
यावेळी गुरुदत्त मल्टिस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे ग्रा.प सदस्य पोपटराव साळुंके भागुजी दादा झावरे सेवा संस्थेचे उपाध्यक्ष रा.बा झावरे माजी सरपंच जगदीश गागरे माजी उपसरपंच शेरूशेठ रोकडे गजानन शेठ झावरे ग्रा.प. सदस्य संजीवनी शिर्के बबनराव गांगड सर पारनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे शाखा उपअभियंता सोनवणे सुदाम शिर्के रावसाहेब बर्वे अमोल उगले प्रा वसुदेव साळुंके मनू दादा झावरे डॉ बाबासाहेब गांगड स्वप्निल झावरे दत्तात्रय साळुंके मिलिंद साळुंखे भास्कर शिर्के टिलू टोपले भास्कर नाना झावरे संभाजी शिर्के संभाजी बर्वे गंगा झावरे बाळकिसन झावरे शासकीय ठेकेदार नगरे सर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सौ राणीताई लंके म्हणाले की ग्रामीण भागातील रस्ते पाणी आरोग्य शिक्षण या मूलभूत सोयी सुविधा बरोबर जलसंधारणच्या कामांना सुद्धा या पुढील काळात आमदार निलेश लंके यांनी प्राधान्य दिले असून या पाझर तलाव दुरुस्ती कामाचा वासुंदे व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा आशावाद सुद्धा सौ राणीताई लंके यांनी व्यक्त केला आहे. आमदार निलेश लंके (Nilesh Lanka) यांच्या माध्यमातून वासुंदे ते मांडवा या रस्त्यासाठी ८ कोटी रुपयांचा निधी वासुंदे ते खराबीवस्तीकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी सोलर हायमॅक्स साठी १४ लाख रुपयांचा निधी तर आता पाझर तलाव दुरुस्तीसाठी ४० लाख रुपयांचा निधी आतापर्यंत वासुंदे गावासाठी देण्यात आलेला असून या पुढील काळात सुद्धा अनेक विकास कामांचे प्रस्ताव पाठवण्यात आले असून विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही असे आश्वासन राणीताई लंके यांनी या भुमीपुजन समारंभ प्रसंगी केले आहे.
चौकट – राणीताई लंकेचे वासुंदेकरांना विकास कामांचे गिफ्ट..
जिल्हा नियोजन समितीच्या व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ राणीताई लंके यांचा बुधवारी वाढदिवस असल्याने या वाढदिवसाची औचित साधून वासुंदे येथील ४० लाख रुपये किंमतीच्या पाझर तलाव दुरुस्तीचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वासुंदे गावातील विकास कामांना निधी कमी पडणार नाही असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले व आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक प्रकारे वासुंदेकरांना या पाझर तलाव दुरुस्ती कामाच्या शुभारंभ करून गिफ्ट पण दिली असल्याची चर्चा रंगली होती.