Ahmednagar: दोन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा देशी विदेशी दारूचा मुद्देमाल नष्ट..

0 156
Destroyed two lakh eighty four thousand rupees worth of domestic and foreign liquor.

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

श्रीगोंदा – जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (Manoj Patil) यांच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्हा पोलीस (Ahmednagar District Police) दलात मुद्देमाल निर्गती मोहीम चालू असल्याने बेलवंडी पोलीस (Belwandi Police) स्टेशनला सन 2020-21 मधील सुमारे 15 गुन्ह्यात दारूबंदी तील दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

मा.प्रथम न्यायदंडाधिकारी श्रीगोंदा न्यायालय यांच्या आदेशान्वये व मा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांच्या आदेशाने सदर गुन्ह्यातील मुद्देमाल नाश करणेबाबत आदेश झाल्याने अहमदनगर राज्य उत्पादन शुल्काचे निरीक्षक जी. टी. खोडवे, उपनिरीक्षक सचिन वामने, बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ , उपनिरीक्षक राजेंद्र चाटे, आणि पोहेकॉ. हसन शेख, पोहेकॉ.ज्ञानेश्वर पठारे, सहाय्यक फौजदार सुनील मोरे, पोकॉ. भांडवलकर, पोकॉ. सोनवणे, पोना, सुरेखा वलवे, पोना.अविदा जाधव, पोना. लोंढे व दोन पंचासमक्ष सदर मुद्देमाल योग्य त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशनच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेत मुद्देमाल घेऊन जाऊन एक खड्डा खोदून सदर खड्ड्यामध्ये सर्व गुन्ह्यातील दारूचे वेगवेगळे बॉक्स फोडून दारूच्या बाटल्यांचे सील तोडून दारू खड्ड्यात ओतून नष्ट करण्यात आली. सदर खड्डे मातीने बुजवण्यात आला. वरील सर्व कार्यवाही पंचासमक्ष व वरील अधिकारी व अंमलदार समक्ष करण्यात आलेली आहे.

Related Posts
1 of 2,107

बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी जनतेला आवाहन केले की पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या दारू,जुगार, मटका इतर  अवैध धंदे कोणी करीत असतील तर त्यांची माहिती तात्काळ बेलवंडी पोलीस स्टेशनला कळवावी अथवा माझ्या मोबाईल फोनवर कळविण्यात यावी. कोणाचीही गय न करता अवैध धंदे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: